Maharashtra Rain : गेल्या तीन ते चार दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर (Heavy Rain) चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अशातच हवमान विभागानं (IMD) आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane) आणि रायगडमध्ये (Raigad) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. मात्र, कालच्यापेक्षा आज पावसाची तीव्रता कमी असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून सांगण्यात येत आहे. मुंबई आणि उपनगरात काही मोजक्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


पालघर आणि नाशिक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी


किनारपट्टी भागातील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या उत्तरेकडे सरकल्याने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबारमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर आणि नाशिकात आज काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  सोबतच, धुळे, नंदुरबारमध्ये देखील धुंवाधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  मराठवाड्यासह आणि विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पुण्यात पावसाचा धुमाकूळ


पुणे शहरासह (Pune Rain)  जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. गेल्या 24 तासांत  सप्टेंबरमधील सर्वाधिक पाऊस पडला आहे.  पुण्यात दोन दिवसापासून पावसाने पुण्याला झोडपले आहे.  पुण्यात मागच्या 24  तासांत 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  5 ऑक्टोबर 2010  नंतर प्रथमच पुण्यात एवढा पाऊस पडला आहे.  पुण्यातील पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.  संपूर्ण पुणे शहराला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय.  पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरलं. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारंबळ उडाली.  यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. पुण्यात मागील 24  तासात 133 मिमी पावसाची नोंद झाली.  आतापर्यंतची तिसरी सर्वोच्च पावसाची आकडेवारी  आहे.  पुण्यात मागील 24 तासात झालेला पाऊस हा सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस आहे.  तर आतापर्यंतची तिसरी सर्वाधिक पावसाची आकडेवारी   आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Pune Weather News: रेकॉर्डब्रेक पावसामुळे उडाली पुणेकरांची दाणादाण, 86 वर्षांनी ढगांनी पाण्याचा इतका रतीब घातला