पुणे: विठूरायाच्या भेटीला निघालेली ज्ञानोबा माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी जाणार आहे. तर संत तुकोबांची पालखी आज आज पुण्यातील लोणी काळभोर मुक्कामी असणार आहे.


ज्ञानोबा माऊलींच्या मार्गातील पहिला अवघड टप्पा असलेल्या दिवे घाटातून आज पालखी मार्गस्थ होईल. दुपारी 3 वाजेच्या सुमारास वारकरी दिवे घाटात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं ज्ञानोबा आणि विठू-रखूमाईच्या जयघोषानं आज दिवे घाट दुमदुमणार आहे.