Wardha Lok Sabha 2024: शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी (NCP Lok Sabha Candidate List) नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंना (Amar Kale) उमेदवारी देण्यात आलीय. विशेष म्हणजे नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमर काळे यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी करत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.


अशातच येत्या दोन एप्रिल रोजी अमर काळे हे इंडिया अलायन्सच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. या करीता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अमर काळेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी वर्ध्यात (Wardha) उपस्थित राहणार आहे. 


वर्धा मतदारसंघात मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन


आगामी लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकांची अधिसुचना जारी करण्यात आली असून यात विदर्भातील बुलढाणा (Buldhana), अमरावती (Amravati), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola), आणि वर्धा (Wardha) जिल्ह्याचा समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच पक्षानी मतदारसंघात आपला प्रचार-प्रसाराचा धूरळा सुरू केला आहे. अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत होतानाचे चित्र आहे.


शरद पवारांच्या उपस्थित अमर काळेंचा उमेदवारी अर्ज


या मतदारसंघात भाजपने सलग तिसऱ्यांदा विद्यामन खासदार रामदास तडस यांना संधी दिली आहे. इंडिया अलायन्सच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून नुकतेच काँग्रेसचा साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेतलेल्या अमर काळेंना शरद पवारांनी संधी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत सहज जिंकणे कुणालाही शक्य होणार नाही, हे चित्र स्पष्ट आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अमर काळेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे. 


रामदास तडस विरुद्ध अमर काळे असा रंगणार सामना 


महायुतीमध्ये भाजपकडून सलग तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणारे खासदार रामदास तडस हे येत्या 3 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर त्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे येत्या 2 एप्रिला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मतदारसंघात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला शह देण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहे. इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार असून देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी आपले लोकसभा हे टार्गेट असल्याचे मत अमर काळेंनी बोलतांना व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या