वर्धा : पाणकोंबड्याची शिकार करत विक्री करणाऱ्या तीन आरोपींना वर्ध्यात अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे असलेले 6 पानकोंबडे वन विभागाने ताब्यात घेतले आणि पानकोंबड्यांना पुन्हा जंगलात सोडून दिलं.


पाणकोंबडे पकडून आरोपी विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर कारवाई करण्यात आली. पीपल्स फॉर अॅनिमल्सचे कुस्तुभ गावंडे आणि वर्धा जिल्ह्यातील वन विभागाचे कर्मचारी यांनी मिळून कारवाई केली आणि तीन आरोपींना 6 पक्ष्यांसह अटक केली.

पाणकोंबड्याची शिकार करुन 200 ते 300 रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती मिळते आहे.

आरोपींकडून पिंजरे आणि पक्षी पकडण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर जिवंत पानकोंबड्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले.