'कलमाडी को लाओ, काँग्रेस बचाओ' आणि 'तिकीट विकणाऱ्यांना हटवा, काँग्रेस वाचवा' अशी वाक्य या पोस्टरवर लिहिण्यात आली आहेत. मात्र ही पोस्टर कुणी लावली, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
दरम्यान, या पोस्टरबाजीमुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसमध्येही तिकीट वाटपावरुन मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात अनेक नेते समोर आले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, नारायण राणे यांनी संजय निरुपमांविरोधातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली होती. तर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची एकाधिकारशाही असल्याचं सांगत पक्षाला रामराम ठोकला होता.
संबंधित बातम्या :