Gram Panchayat Election 2022 : राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज (16 ऑक्टोबर 2022) मतदान (Maharashtra Gram Panchayat Election) होणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी (Sarpancha) आज मतदान (Voting) होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व ठिकाणी मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे.
या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आज होणारी ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण या सर्व ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची निवडणूक (Sarpanch Election) ही थेट जनतेमधून होणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (17 ऑक्टोबर) लागणार आहे.
सोमवारी होणार मतमोजणी
1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. तर सोमवारी (17 ऑक्टोबर) मतमोजणी होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे. आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.
अकोला पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक
अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सभापतीपदासाठी आणि उपसभापती पदाची निवडणूक होत आहे. सातही पंचायत समित्यांवर वंचित बहुजन आघाडीचा वरचष्मा आहे. मात्र, वंचितचे पुर्ण बहूमत असलेल्या सर्वात मोठ्या अकोला पंचायत समितीत भाजपला लॉटरी लागती. कारण एसटी महिला राखीव उमेदवार त्यांच्याकडेच आहे. याशिवाय आज वेळेवर काही नवी समिकरणं उदयास येतात का? हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.
जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या
ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.
पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70 ( पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत 711 सदस्य बिनविरोध तर १० सरपंच बिनविरोध आलेत, तर जिल्ह्यात पाच ग्रामपंचायती बिनविरोध आहेत )
रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.
रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.
सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2. नाशिक:
इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.
महत्त्वाच्या बातम्या: