ठाणे : ठाणे विधानपरिषद निवडणुकीत वसंत डावखरे डाव जिंकणार की रवींद्र फाटक बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 6 जून रोजी मतमोजणी होईल.


 

ठाणे विधानपरिषदेसाठी आज मतदान, डावखरे-फाटक यांच्यात चुरस


 

 

ठाणे महापालिकेतील सर्वच मतदारांनी हक्क बजावला तर कल्याणमध्येही 100 टक्के मतदान झालं.  ठाणे विधानपरिषदेठी 99.72 % मतदान झालं आहे. एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 519 पुरुष मतदारांनी तर 538 महिला मतदारांनी मतदान केलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलं.

 

 एकदा शब्द दिला म्हणजे दिला, आमची सर्व मतं डावखरेंनाच : हितेंद्र ठाकूर



राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी आव्हान दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. भाजपने रवींद्र फाटक यांना पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरेंना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे.

 

हितेंद्र ठाकूर यांचा डावखरेंंना पाठिंबा, सेना-भाजपची धावाधाव

 

मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसंच दगाफटका टाळण्यासाठी दोन्ही पक्षातले नेते आपापल्या नगरसेवकांची विशेष काळजी घेताना दिसत होते.


विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी