पंढरपूर : विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत असले तरी विठुरायाचे विकतचे ऑनलाईन दर्शन बेकायदा असून घटना बदलण्याची मागणी माजी सदस्य वा. ना. उत्पात यांनी केली आहे.
दुसरीकडे विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्यानंतर अध्यक्ष अतुल भोसले आणि सहयोगी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
माजी सदस्य वा. ना. उत्पात यांनी हा निर्णय स्वागतार्ह असला तरी घटनाविरोधी असल्याने आधी घटना बदलण्याची मागणी केली आहे. विठ्ठल दर्शनाला गेल्या काही महिन्यापासून ऑनलाईन दर्शन योजनेला देशभरातील भाविकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र यातून मंदिराला कोणतेच उत्पन्न मिळत नव्हते. मात्र ऑनलाईन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना झटपट दर्शन मिळू लागल्याने सर्वसामान्य भाविकांच्या रोष तयार होऊ लागला होता. यातूनच मंदिर समितीने ऑनलाईन दर्शन घेणाऱ्या भाविकांना संक्रांतीनंतर 100 रुपये आकारण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेतला.
यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता हा निर्णयचं मंदिर समितीच्या घटनेच्या विरोधात असल्याचे मत माजी मंदिर समिती सदस्य वा.ना. उत्पात यांनी मांडले असून हा निर्णय स्वागतार्ह असला तरी यासाठी समितीने आधी घटनेत बदल करून मगच या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारल्यास मंदिराला वर्षभरात 8 ते 10 कोटी रुपयांचे अधिक उत्पन्न मिळणार आहे. आता या नवीन वादामुळे विकतच्या ऑनलाईन दर्शनाची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी पैसे लागणार
विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता पैसे लागणार आहेत. विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये घेण्याच्या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत असून आता घुसखोरी करणाऱ्या VIP साठीही पैसे घेऊन दर्शन देण्याची मागणी केली आहे. विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेतला आहे. देशभरातून येणारे बहुतांश उच्च व मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. त्यामुळे या भाविकांना मोफत झटपट दर्शनाचा लाभ मिळतो. यामध्ये काही मंडळी गैरप्रकार करुन पैसे मिळवायचा उद्योग देखील सुरु केला होता.
वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता 330 दिवस रोज सरासरी दोन हजार भाविक हे ऑनलाईन दर्शन घेत असतात. मंदिराच्या आजच्या निर्णयामुळे यापुढे ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला 8 ते 10 कोटी रुपयाची वाढ होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकांना काहीच त्रास होणार नसल्याने भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
मात्र याचसोबत फुकटची घुसखोरी करुन दर्शनासाठी येणाऱ्या VIP लोकांकडूनही पैसे वसूल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घ्यावा, अशी मागणी भाविकांतून होत आहे. या व्यवस्थेतून मिळणाऱ्या पैशांतून विकासकामे करणे मंदिर समितीला शक्य होणार आहे.
विठुरायाचे विकतचे ऑनलाईन दर्शन बेकायदा, मंदिर समितीत मतभेद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Jan 2019 06:01 PM (IST)
दुसरीकडे विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला 100 रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्यानंतर अध्यक्ष अतुल भोसले आणि सहयोगी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांच्यातील मतभेद समोर आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -