कोल्हापुरात विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2017 07:12 PM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात विश्वास नांगरे पाटील किरकोळ जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातात विश्वास नांगरे पाटलांना किरकोळ इजा झाली.