पनवेल: पनवेल महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत पनवेलकरांनी भाजपच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे पनवेलकरांनाही भाजपकडून बऱ्याच आशा आहेत. मात्र, असं असलं तरीही पनवेलमध्ये निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांवर बरेच गुन्हे दाखल आहेत. एका विशेष रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
पनवेलमधील पक्षीय बलाबलभाजप - 51शेकाप - 23काँग्रेस - 2राष्ट्रवादी काँग्रेस - 2एकूण - 78
पनवेलमधील एकूण 78 नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवकांवर बरेच गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत. त्यामुळे हे नगरसेवक पनवेलकरांच्या आशा कशा पूर्ण करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
78 पैकी 17 नगरसेवकांवर साध्या स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच 22 टक्के नगरसेवकांवर गुन्हे आहेत. तर 78 पैकी 11 नगरसेवकांवर (15%) गंभीर स्वरुपाचे म्हणजेच खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक यासारखे गुन्हे दाखल आहेत.
कोणत्या पक्षातील किती नगरसेवकांवर गुन्हे दाखल?
- भाजपच्या 51 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवकांवर गुन्हे दाखल, म्हणजेच 29 टक्के नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत.
- शेकापच्या 23 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवकांवर गुन्हे दाखल, म्हणजेच 9 टक्के नगरसेवकांवर गुन्हे दाखल आहेत.
कोणत्या पक्षातील किती नगरसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल?
- भाजपच्या 51 नगरसेवकांपैकी 11 (29%) नगरसेवकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- शेकापच्या 23 नगरसेवकांपैकी एका नगरसेवकावर (4%) गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पक्ष
निवडून आलेले नगरसेवक
निवडून आलेल्या नगसेवकांवर साध्या स्वरुपाचे गुन्हे दाखल
साध्या स्वरुपाचे गुन्हे दाखल टक्क्यांमध्ये
निवडून आलेल्या नगसेवकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल टक्क्यांमध्ये
भाजप
51
15
29%
11
22%
शेकाप
23
2
9%
1
4%
इतर
4
0
0%
0
0%
एकूण
78
17
22%
12
15%
दरम्यान, याबाबतची माहिती या नगरसेवकांनी आपल्या प्रतिज्ञापत्रातच दिली आहे.
पनवेलमधील नगरसेवक हे मोठ्या प्रमाणात श्रीमंत असल्याचंही या रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. 78 नगरसेवकांपैकी तब्बल 60 नगरसेवक कोट्यधीश आहेत. म्हणजेच 77% नगरसेवक हे करोडपती आहेत.
कोणत्या पक्षात किती श्रीमंत नगरसेवक?
- भाजपच्या 51 नगरसेवकांपैकी 40 (78%) नगरसेवक कोट्यधीश
- शेकापच्या 23 नगरसेवकांपैकी 17 (74%) नगरसेवक कोट्यधीश
- पनवेलमध्ये काँग्रेसचे दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, हे दोन्ही नगरसेवक कोट्यधीश आहेत. म्हणजेच काँग्रेसचे 100% नगरसेवक हे करोडपती आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांपैकी 1 नगरसेवक (50%) कोट्याधीश आहे.
म्हणजेच एकूण 78 नगरसेवकांपैकी 60 नगरसेवक हे कोट्यधीश आहेत.
* या प्रत्येक नगरसेवकाची सरासरी संपत्ती ही 5.61 कोटींच्या पुढे आहे.
दरम्यान, पनवेलमधील प्रभाग क्र. 19 अ मधील भाजपचे नगरसेवक परेश राम ठाकूर हे पनवेलमधील सर्वात श्रीमंत नगरसेवक ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती तब्बल 95 कोटींपेक्षा जास्त आहे.
पनवेलमध्ये एकीकडे कोट्यधीश नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून आले असले तरीही तीन असे नगरसेवक निवडून आले आहेत की, ज्यांची संपत्ती ही 3 लाखांपेक्षाही कमी आहे.
मंजुळा कातकरी - काँग्रेस, एकूण संपत्ती: 6,000
आरती नवघरे - भाजप, एकूण संपत्ती: 1,92,550
महादेव माढे - भाजप, एकूण संपत्ती : 2,83, 263
श्रीमंत आणि गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांप्रमाणेच बरेचसे नगरसेवक हे अल्पशिक्षित आहेत.
किती नगरसेवक कितवी पास?5वी पास - 8 नगरसेवक8वी पास - 18 नगरसेवक10वी पास - 7 नगरसेवक12वी पास - 19 नगरसेवकपदवीधर - 13 नगरसेवक पदवीधर (व्यावसायिक) पास - 6 नगरसेवकइतर - 4 नगरसेवक माहिती दिलेली नाही - 3 नगरसेवक एकूण - 78 नगरसेवक.
दरम्यान, पहिल्यांदाच महापालिकेत गेलेले हे नगरसेवक कशी कामगिरी बजावणार याकडेच पनवेलकरांचे डोळे लागून राहिले आहेत.