Vishwajeet Kadam: काँग्रेस पक्षासाठी आज संघर्षाचा काळ आहे आणि आपण विरोधी पक्षाच्या बाकावर आज बसलो आहोत. काँग्रेसचे आज केवळ 16 आमदार आहेत. पण जरी आम्ही 16 आमदार असलो तरी पुढच्या 5 वर्षात जर हे सत्तेतील सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबत चुकीचं वागले तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये असल्याचा गर्भित इशारा आमदार आणि माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला. कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त 'लोकतीर्थ' या वर्षपूर्ती समारंभात डॉ.विश्वजित कदम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, खासदार विशाल पाटील उपस्थित होते.
मी पतंगराव कदम यांचा मुलगा
विश्वजित कदम म्हणाले की, मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे, बंटी पाटील आमचा वाघ आहे, विजय वडेट्टीवार विदर्भाचे वाघ आहेत आणि खासदार विशाल पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षाचे विचारावर लढत आहेत. आपला पक्ष सत्तेवर नसल्यामुळे आपली कामे होत नाहीत असा एक कार्यकर्त्याचा सूर आहे. 1980, 1985 साली ज्यावेळी पतंगराव कदम उभे राहिले होते त्यावेळी पतंगराव कदम यांच्यासोबत कोण होतं. त्यावेळी तर निवडणुकीच्या वेळी पतंगराव कदम यांच्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडे झेलली आहेत अशा लोकांसाठी आता मला इथून पुढे काम करायचे आहे असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे.
विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला
त्यांनी पुढे सांगितले की, सतेज उर्फ बंटी पाटील आमचे वाघ आहेत. जे सोबत आहेत त्यांना घेऊन आम्ही सर्व लढत आहोत. आम्ही सर्वजण पतंगराव कदम यांच्या विचारने काम करत आहोत. विजय वडेट्टीवार सलग तीनवेळा आमदार झाले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बंटी पाटील हे माझे मार्गदर्शक आहेत. विशाल पाटील यांना आम्ही कस निवडून दिलं हे आमचं आम्हाला माहीत आहे. विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्याने आम्ही उठाव केला. त्या निमित्ताने सांगलीने माझं वेगळं रूप देखील पाहिलं.
इतर महत्वाच्या बातम्या