20 जानेवारीला तावडेच्या जामिन अर्जावर कोल्हापूर सत्र न्यायालयात युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यावेळी विरेंद्र तावडेला जामिन देऊ नये असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. तर तावडे दोषी असल्यासंदर्भात कोणताच सबळ असा पुरावा नाही, त्यामुळं त्याला जामीन मिळावा अशी मागणी तावडेच्या वकिलांनी कोर्टाकडं केली.
त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश आणि कोल्हापूरला येण्यास मज्जावही करण्यात आला आहे.