नवी दिल्ली: राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींकडून 6 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.  प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नरेंद्र जाधव, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी, बंगालमधले भाजप नेते स्वपनदास गुप्ता, बॉक्सर मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू आणि मल्याळम अभिनेता सुरेश गोपी यांची नियुक्ती झाली आहे.


 

राज्यसभेवर निवडल्या जाणाऱ्या राष्ट्रपती नामनिर्देशित 12 पैकी 7 जागी नियुक्ती बाकी होती. त्यापैकी सहा जागांवर नियुक्ती करण्यात आली.

 

राज्यसभेचे खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांच्यासह इतर 7 सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे.

 

दरम्यान माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू भाजपचे माजी खासदार होते. लोकसभा निवडणुकीत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासाठी त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातील जागा सोडली होती. त्यामुळे सिद्धू नाराज असल्याची चर्चा होती.

 

दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. मीडियात भाजपची बाजू भक्कमपणे मांडण्याचं काम, स्वामी करतात.