मुंबई: भारतीय सैन्यदलातील असुविधा चव्हाट्यावर आणलेले बीएसएफचे जवान तेज बहाद्दूर यादव यांच्याबाबत एक अफवा सोशल मीडियावर पसरत होत आहे.


तेद बहाद्दूर यादव हे एका चकमकीत ठार झाल्याची अफवा पसरत आहे. मात्र याबाबत स्वत: बीएसएफचे महासंचालक के के शर्मा यांनी स्पष्टीकरण देत, तेज बहाद्दूर यादव हे सुरक्षित असल्याचं सांगितलं.

तसंच ही अफवा पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयकडून जाणीवपूर्वक पसरवली जात असल्याचं शर्मा यांनी सांगितलं.

" तेज बहाद्दूर यादव हे जम्मू काश्मीरमधील संरक्षित कोठडीत आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. पाकिस्तानच्या आयएसआयकडून ही अफवा पसरवली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा त्यांचा डाव आहे", असं के के शर्मा म्हणाले.

याशिवाय बांगलादेश सीमेतून भारतात दहशतवादी घुसल्याची अफवाही खोटी असल्याचं शर्मांनी सांगितलं.

'फर्स्ट पोस्ट' ला दिलेल्या मुलाखतीत के के शर्मा यांनी याबाबतची माहिती दिली.

तेज बहाद्दूर यांच्या नावे जो फोटो फिरवला जात आहे, तो सीआरपीएफचे जवान हिरा वल्लभ भट यांचा आहे. भट हे 11 मार्चला नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत.

कोण आहेत तेज बहाद्दूर यादव?

तेज बहाद्दूर यादव हे बीएसएफचे जवान आहेत. त्यांनी भारतीय सैन्यदलातील असुविधांबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला होता.

या व्हिडिओच्या माध्यमातून लष्करी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. आम्ही सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचे म्हणत तेज बहादूर यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकवेळा तर उपाशी झोपावं लागत, असल्याचंही या जवानाने म्हटलं आहे. तेज बाहदूर यादव असं या जवानाचं नाव आहे.

“आम्ही सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सलग 11 तास या बर्फात उभं राहून कर्तव्य बजावतो. पाऊस असो, वारा असो कोणत्याही परिस्थितीत कर्तव्य पार पाडतो.”, असे सांगताना तेज बहादूर यादव यांनी शूट केलेला व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करण्याचं आवाहनही देशवासियांना केलं होतं.



संबंधित बातम्या

'मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले', जवानाचा बीएसएफला सवाल

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप

VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल