मुंबई : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असेल. देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.
जूनमध्ये 102 टक्के पाऊस होऊ शकतो. यामध्ये 70 टक्के शक्यता सामान्य पावसाची आहे, 20 टक्के शक्यता सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पावसाची आहे, तर 10 टक्के शक्यता कमी पाऊस होण्याची आहे.
जूननंतर जुलैमध्ये 94 टक्के, ऑगस्टमध्ये 93 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.