मुंबई : दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे फक्त लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात यावेत, यासाठी राज्य सरकारनं धडपड सुरू केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी चर्चा करणार आहे.


यावर्षी महाराष्ट्र बोर्डाचा दहावाची निकाल फक्त 77 टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालाच्या टक्केवारीत तब्बल 12 टक्क्यांची घट पाहायला मिळाली. या तुलनेत सीबीएसई आणि आयसीएसईचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं अकरावीसाठी प्रवेश घेताना महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी पिछाडीवर पडू नये म्हणून सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

VIDEO | एसएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय द्या | मुंबई | ABP Majha



मात्र या विद्यार्थ्याना अजून 2 ते 3 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असून अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी किंवा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता मुंबई शिक्षण विभागाचे उपासनाचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे

आजच शिक्षण उपसंचालक कार्यलयाकडे दहावीच्या निकालाचा डेटा आला असून तो अपलोड होऊन वेळापत्रक जाहीर होण्यास 2 ते 3 दिवस लागतील.

त्यामुळे आता लेखी परीक्षेतल्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्रालय हिरवा कंदील देणार का याकडे विद्यार्थी आणि पालकवर्गाचं लक्ष लागल आहे.