Vinayak Raut : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा एक हजार एक टक्के विजय निश्चित असल्याचा विश्वास खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी व्यक्त केला. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रशासन जर सत्ताधारांचे आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून वावरत असतील तर त्यांना प्रशासनाची योग्य ती जाणीव करुन देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर आहे. महापालिकेचं प्रशासन सत्ताधारऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे राऊत म्हणाले. प्रशासनाचे कान टोचल्याबद्दल हायकोर्टाचे राऊत यांनी आभार मानले. प्रत्येक गोष्टीला उच्च न्यायालय हाच जर मार्ग असेल तर मुंबई महापालिकेचे प्रशासन बरखास्त करा असेही राऊत म्हणाले.


शिंदे सरकार हे पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग करत आहे


प्रशासन जर सत्ताधारांचे आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून वावरत असतील तर त्यांना प्रशासनाची योग्य ती जाणीव करुन देण्याची जबाबदारी मुंबईकरांवर आहे. हायकोर्टाचा दणका मिळाल्यानंतरच त्यांना शहाणपणा सुचला असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला. शिंदे सरकार हे पोलीस आणि प्रशासनाचा दुरुपयोग करत आहे. त्यांच्याच मंत्र्यांचा शिंदे सरकारवर विश्वास नसल्याचे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या मुद्यावरुन देखील विनायक राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. शिंदे सरकार हे सद्या बाहुले म्हणून बसलं असल्याचे ते म्हणाले.


तुमच्या मंत्र्यांनी शिवीगाळ केलेली चालते का


अंधेरी पूर्व विधानसभा विरोधी उमेदवाराने डिपॉझीट वाचवण्याचा प्रयत्न करावा असेही राऊकत म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कसाही नंगानाच केलेला चालतो. उद्धव ठाकरेंचा ऐकेरी भाषेत उल्लेल करणं, त्यांना शिवीगाळ करणं करणं त्यांना चालते. तुमच्या एका आमदाराने दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केली ते चालते. तुमचे इतर मंत्री, नेत्यांनी हैदोस घातलेला चालतो. मात्र, शिवसेनेच्या सर्व मंडळींनी आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा उपयोग करुन टीका टिप्पण्णी केली तर 153 च्या नोटीसा द्यायच्या असे राऊत म्हणाले. आम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे. त्यानुसार आम्ही आमची मत मांडत असल्याचे राऊत म्हणाले. पोलीस आणि प्रशासन यांचा शिंदे सरकार दुरुपयोग करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.


ऋतुजा लटके यांचा राजीनामा अखेर स्वीकारला


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील  शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके  यांचा राजीनामा अखेर स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेकडून लटकेंचा राजीनामा मंजूर झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा लटकेंचा मार्ग मोकळा झाला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मनपाला दिले होते. त्यानुसार मनपानं त्यांचा राजीनामा मंजूर केलाय. ऋतुजा लटके यांनी मनपा कार्यालयात जाऊन राजीनाम्याचं पत्र घेतले. राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.


महत्त्वाच्या बातम्या:


मुंबई महापालिकेने अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा