Vijay Wadettiwar : बिहार आणि युपीच्या पुढे जाताना महाराष्ट्र पाहायला मिळत आहे. कायद्याचं संरक्षण करणारे यांनी कायद्याच्या चौकटीत असलं पाहिजे, या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही मागणी आम्ही केली होती. मुख्यमंत्र्यांनी म्हटल होतं की दोन महिन्यांत आम्ही फाशी देऊ. मात्र, आता फाशी बदलून थेट गोळीने फाशी दिल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. जी प्रेस नोट काढली ही हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


तर बृजभुषण यांचा एन्काऊंटर का केला नाही?


त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सर्व आपटे नाही पण जे आरोपी आपटे आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का? चाईल्ड तस्करी आणि पोर्नग्राफी करण्यात रॅकेट आहे, ते समोर येईल. या शाळेतील एक मुलगी गायब आहे. यामध्ये आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. एन्काऊंटरनंतर पेपरला जाहिराती दिल्या आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री यांच्या आदेशाने ही एन्काऊंटर झाला का? अशी विचारणा त्यांनी केली. कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री याच समर्थन करत आहे. 


वडेट्टीवार म्हणाले की, जर एन्काऊंटर करायचा होता, तर बृजभुषण (brij bhushan sharan singh) यांचा का केला नाही? किती तरुणींचा विनयभंग केला मग या त्रिकुटाने का मागणी केली नाही? वडेट्टीवार पुढे म्हणाले की, बुरखा आणि हातकडी असताना तो फायर करतो. पोलिसांच्या बंदूकीला लाॅक असतं. त्या कैद्याच्या हातात बेडी असते. कैद्याला ने आण करण्याच काम कधीही गुन्हे शाखेची नसते, या अधिकाऱ्याचा मागील इतिहास वेगळा आहे. तेलंगणामध्ये असाच चार आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला. त्यावेळी कोर्टाने त्यांच्यावर 402 चा गुन्हा दाखल केला. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहेत ते घरात मजा मारत आहेत. ते भाजप आणि आरएसएस संबंधित आहेत. त्यांना वाचवण्याच काम सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली. 


नागपुरात गुन्ह्यांची मालिका 


वडेट्टीवार यांनी नागपुरातील गुन्ह्यातील आकडेवारी सांगत मला लाज वाटत असल्याचे म्हणाले. नागपूरमधून 6 हजार 139 गुन्ह्यांची नोंद झाली. 213 महिलांवर सात महिलांवर लैंगिक अत्याचार झाला. विनयभंग 320 झाले आहेत. पाॅस्को 172 झाले आहेत. ही आकडेवारी गृहमंत्र्यांच्या शहरातील असल्याने लाज वाटते. 


इतर महत्वाच्या बातम्या