Vijay Wadettiwar :  मंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नाशिकमधील (Nashik) घर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा (Police) बंदोबस्तात वाढवण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या जीआरबाबतच्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट झालं आहे. छगन भुजबळांच्या केसाला जर धक्का लागला तर ओबीसी आणि मराठा आमने-सामने येतील. राज्याचं आणि अर्थव्यवस्थेचं नुकसान होईल, त्यामुळं अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची राज्य सरकारनं खबरदारी घ्यावी, असे मत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केलं आहे. 

एखाद्या मुद्द्यावर जनता आपल्यामागे आली म्हणून डोक्यात हवा जाता कामा नये. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो अशा प्रकारचं वक्तव्य टाळलं पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले. मनोज जरांगे यांना असं सुचवायचं आहे का की एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे आंदोलन झालं? शिंदेंचा या आंदोलनाला पाठबळ आहे असं त्यांना काही म्हणायचं आहे का?असा सवालही वडेट्टीवार यांनी केला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा जीआर मुळे नुकसान होणार नाही असं म्हणत त्याचं स्वागत केलं आहे. काही संघटनांनी सरकारचं मांडलिकत्व स्वीकारलं आहे. त्यामुळं त्या संघटना जीआरचं स्वागत करत आहेत. ही सर्व प्रक्रिया ओबीसींच्याच वाट्यातून आरक्षण देण्याची आहे. तुम्ही हा दुर्दैवी निर्णय घेतलाच असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवा असे वडेट्टीवार म्हणाले. 

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची माणसं ही सरकारच्या ताटाखालची मांजरं

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची माणसं ही सरकारच्या ताटाखालची मांजरं आहेत, 2014 पासून देशात जाती आणि धर्माचं विष कालवण्याचं काम सुरू झालं आहे आणि ही त्याचीच उत्पत्ती आहे. एक लाख कोटी रुपयांचं नेट वर्थ असलेल्या कंपनीने कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करावे हे योग्य नाही. वारंवार या घटना होत आहेत. त्यामुळं मॅनेजमेंटवर कारवाई करणे आवश्यक आहे. कंपनीचं कामगारांच्या सुरक्षाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे सरकारने कठोर पावलं उचलावी अशी आमची मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

मोदींनी आतापर्यंत देशाला विकून खाल्ल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखीलविजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. मोदींनी आतापर्यंत देशाला विकून खाल्ल्याची टीका विजय वेडेट्टीवार यांनी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या साहित्यावर पण जीएसटी लावला, सिमेंटवर जीएसटी लागला, म्हणजे गरीबाचं घर महाग झालं आहे. याचा फायदा कंपन्यांना होणार आहे. देश आर्थिक दृष्ट्या कमकुवत होत आहे आणि या बदलांमुळं काही फायदा होईल असं मला वाटत नाही असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Vijay Wadettiwar & Yogesh Kadam : महाराष्ट्रात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो, वडेट्टीवारांचं विधानसभेत वक्तव्य; गृहराज्य मंत्री म्हणाले....