Vijay Wadettiwa : "आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल. येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा द्यायच्या, असा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.  गोव्यात कॉंग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या  संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला. ते भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. संजय राऊत यांचे एक अंकी आमदार  हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे वड्डेट्टीवार यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

"आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत. त्यामुळे गोवा व इतर राज्यातील युतीबाबत कांग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल, असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. 

शिवसेनेला UPA मध्ये समाविष्ट करून घेण्यासंबधी लोकसभेच्या निवडणुका लागताच कांग्रेस हायकमांड निर्णय घेईल.  संजय राऊत यांच्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा UPA मध्ये समाविष्ट होणार असल्याचा विश्वासही यावेळी विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला.   ओबीसी विद्यार्थ्यांना हाताला काम देण्यासाठी करडई क्लस्टर योजना 

Continues below advertisement

 ओबीसी विद्यार्थ्यांना हाताला काम देण्यासाठी करडई क्लस्टर योजना सूरू करणार आहे. 9 जिल्ह्यात या योजनेत 50 घाणे तयार करण्यात येणार असून 15 हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी 15 हजार हेक्टर करडई बियाने तयार करण्यात येणार  असल्याचे वड्डेट्टीवार यांनी सांगितले.     

महत्वाच्या बातम्या