मुंबई : राज्य सरकारला 2020 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. प्रत्येक नैसर्गिक संकटानंतर राज्याने केंद्राला मदतीसाठी पॅकेजची मागणी केली. पण केंद्राकडून राज्याला एक ही पैसा आलेला नाही. 1065 कोटी निसर्ग चक्रीवादळ मदत मागितली, 814 कोटी पूर्व विदर्भातील पूर, दोन्ही वेळा टीम आली. प्रस्ताव पाठवले पण अजून एक रुपया मदत आलेली नाही.
अतिवृष्टी झाल्यावर केंद्रीय पथकाने राज्यात पाहणीसाठी यावे म्हणून मुख्य सचिव यांनी पत्र पाठवले. मुंख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना 15 ऑक्टोबरला केंद्रीय पथक पाठवावे म्हणून पत्र लिहिले पण अजून ही केंद्रीय पथक आलेले नाही. अतिवृष्टी होऊन 15 दिवस झाले केंद्राचे पथक नाही आणि याआधी झालेल्या नुकसान साठी एक रुपयांची मदत नाही, असं विजय वड्डेटीवार यांनी सांगितलं.
एवढं मोठं नुकसान झालं केंद्राची जबाबदारी आहे की नाही? लोकांचे जीव गेल्यावर मदत मिळणार का? केंद्र सरकारची मदत करायची मानसिकता आहे का असा प्रश्न पडतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत करु
शेतकऱ्यांना दिवाळी आधी मदत देण्याची आमची तयारी झाली आहे. निवडणूक जाहीर झाली आहे. राज्य निवडणूक आयोगला याबाबत कळवलं आहे. पॅकेजची आम्ही आधीच घोषणा केली होती. राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या तो केंद्रीय निवडणूक आयोगाला देतो. त्यांनी परवानगी दिली की मदत देऊ. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देऊ असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं.
लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत आम्ही पत्र पाठवले
मुंबईत लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत राज्य सरकारने पत्र पाठवले आहे. काहीतरी त्रुटी काढतात. सर्वसामान्य लोकांसाठी शेड्युल तयार करून दिला आहे. सगळं तयार करून दिल्यावरही त्रुटी काढल्या जात आहेत. आम्ही आमची यंत्रणा राबवत आहोत, आम्ही सहकार्य करत आहोत त्यांनी परवानगी द्यावी, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. तसेच नोव्हेंबरच्या शेवट पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
Vijay Wadettiwar | लोकलबाबत रेल्वेकडून त्रुटी काढण्याचं काम, विजय वडेट्टीवारांचा रेल्वेवर आरोप