Vidhan Parishad Election :  भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. जगताप आणि टिळक यांच्या ऐवजी त्यांची मतपत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. प्रकृती ठिक नसताना दोन्ही आमदारांनी पुण्याहून मुंबईला येऊन विधानपरिषदेसाठी मतदान केले. 


लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची प्रकृती ठिक नाही. परंतु, या दोन्ही आमदारांनी विधानपरिषदेसाठी मतदान केले आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांची मतपत्रिका त्यांच्याऐवजी इतर कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुक्ता टिळक यांच्याही मतावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.  


काँग्रेसकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे मेलवरून तक्रार केली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मते रद्द करण्यात यावीत अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


काय आहे काँग्रेचा आक्षेप?
विधान परिषदेसाठी गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. परंतु, असे असताना लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी दुसऱ्याच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. 
मतदान करताना दोन्ही आमदारांनी मतपत्रिकेवर सही केली. परंतु,पसंतीची मतं देत असताना जगताप आणि टिळक यांनी ऐवजी दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. 


भाजपकडून टीका
दरम्यान, काँग्रेसच्या या आक्षेपावर भापकडून टीका करण्यात आलीआहे. काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे असे प्रकार केले जात आहेत, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.  
प्रकृती ठिक नसताना देखील मताचा अधिकार बजावण्यासाठी हे दोन्ही आमदार पुण्याहून मुंबईला आले होते. परंतु, काँग्रेसकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे मतमोजणीला वेळ लागणार की, वेळेत होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


कायदा काय सांगतो?
प्रकृती ठिक नसेल तर मतदान करण्यासाठी सहकाऱ्याची मदत घेण्याचा अधिकार आहे. हा सहकारी किमान 18 वर्षांपेक्षा जास्त असावा आणि त्याने संबंधित आजारी व्यक्तीचे मतदान गुप्त ठेवावे असा नियम असल्याची माहिती माजी विधीमंडळाचे सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली.  


महत्वाच्या बातम्या


Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी बदलली, भाई जगताप यांना तिसऱ्या पसंतीची एकगठ्ठा मतं