Vidhan Parishad Election 2021 LIVE Updates : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Vidhan Parishad Election 2021 : विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला जागांसाठी आज मतदान, मतदानाच्या 12 तासआधी नागपुरात काँग्रेसवर उमेदवार बदलायची नामुष्की

abp majha web team Last Updated: 10 Dec 2021 10:43 AM
नागपूरात दुपारी 12 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाले. एकूण 560 मतदार या निवडणुकीत आहेत. 12 वाजेपर्यंत 140 मतदारांनी आपला मताधिकार बजावला.
 
बुलढाणा विधानपरिषदेसाठी आज मतदान, 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत केवळ 4 जणांनी केलं मतदान

बुलढाणा : विधानपरिषद निवडणूक अपडेट

जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंतच्या दोन तासात फक्त चार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

देऊळगाव राजा - 1, मेहकर - 1 , जळगाव जामोद - 2  = दोन तासात 4 मतदान

अकोल्याच्या महापौर अर्चना मसने यांनी केलं मतदान

अकोल्यात विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान सुरू. तब्बल पावणेदोन तासांनी पहिलं मतदान. भाजप  नगरसेवक गटानं मतदान केंद्रावर. अकोल्याच्या महापौर अर्चना मसने यांनी केलं मतदान.

अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु

विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान होणार असून 168  मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.  तर मालेगाव नगर पंचायत निवडणूक लांबल्याने 19 मतदारांना आपला हक्क बजावता येणार नाही.  तर  मानोरा नगर पंचायत19 मतदारांना निवडणूक लागल्यानं  19 मतदारांना ही मतदान करता येणार नाही. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गाेपिकिशन बाजाेरीया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी मात्र गट तटा च्या राजकारणामुळे राजकीय चित्र बदलू शकतो.

अकोला-बुलढाणा-वाशिममधील जिल्हानिहाय मतदार

जिल्हामतदार 
अकोला287
वाशीम168
बुलढाणा367

अकोला-बुलढाणा-वाशिम विधानपरिषदेवर कोणाचं वर्चस्व?

विधान परिषदेच्या अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघासाठी 22 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. एकूण 822 मतदार असून, यात 387 महिला तर 535 पुरुष मतदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेवाल निवडणूक रिंगणात आहेत. सर्वाधिक मतदार महाविकास आघाडीकडे असले तरी वंचित बहुजन आघाडी आणि अन्य मतदार निर्णायक ठरणार आहेत, असं जाणकारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष पेन उपलब्ध करून  देण्यात आला आहे. या पेनचा उपयोग करुनच मतदारांना मतदान करावं लागणार आहे. मतदान करताना मतदारांनी पसंतीक्रम दर्शवावा लागेल. पसंतीक्रम इंग्रजी, मराठी आणि रोमन या लिपीतच दर्शवावा लागणार आहे. 

नागपुरात भाजपचं पारडं जड

नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. नागपूरात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नागपूर मतदार संघासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे.

काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सध्या तरी भाजपचं वर्चस्व दिसत आहे. त्यामुळे नागपूर विधानपरिषद निवडणूक ही चुरशीची होणार आहे. 

नागपूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये रंगत आली आहे. राज्यातील इतर जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मात्र होणार आहे. काँग्रेसकडून छोटू भोयर उर्फ रवींद्र भोयर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. निवडणुकीआधी 34 वर्ष भाजपसोबतचा प्रवास संपवत भोयर यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडून ते विधानपरिषदेसाठी लढणार होते. परंतु निवडणुकीला काही तास शिल्लक असताना कॉंग्रेसने भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे मैदानात आहेत.

विधान परिषदेच्या दोन जागांसाठी आज मतदान

Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदेच्या दोन जागांवर आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने उभे ठाकले आहेत. नागपूर आणि अकोला (Akola) बुलढाणा (Buldhana)-वाशिम (Vashim) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नागपुरात काँग्रेसनं काल (गुरुवारी) ऐनवेळी उमेदवार बदलल्यानं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले मंगेश देशमुख यांच्यात लढत होणार आहे. तर अकोला-बुलढाणा-वाशिम मतदारसंघात तीन वेळा विजय मिळवलेले शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया यांना भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी आव्हान दिलं आहे. या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना दोन्ही ठिकाणी होत आहे. 

निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या, तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत होत आहे. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली आहे. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.