Vidarbha Weather Update: राज्यासह विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होतानाचे चित्र आहे. एकीकडे निम्म्या विदर्भात उष्णतेचा पारा (Vidarbha Heat) चाळीशी पार गेला असतांना अचानक अवकळी पावसाने एन्ट्री केली आहे. अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून आज विदर्भातील वाशिम आणि बुलढाणा वगळता इतरत्र विजांच्या कडकडाटासह 30-40 प्रती तास सोसाट्याचा वारा आणि दमदार पावसाचा (Rain Prediction) इशारा देण्यात आला आहे. सोबतच आज अकोला अमरावती आणि यवतमाळ मध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यताही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता शेतकरी, कृषि उत्पन्न बाजार समित्यासह नागरिकांनी योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. 


निम्म्या विदर्भात उष्णतेची लाट


गेल्याकाही दिवसांपासून विदर्भात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी झालेल्या पावसानंतर आता पुन्हा तापमानात लक्षणीय वाढ होत असून आजघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात उष्णतेच्या (Heat) पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. तर आज विदर्भात सर्वाधिक तापमान 41.4 अंश सेल्सिअस हे वाशिम जिल्ह्याचे (Washim) नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल ब्रम्हपुरी येथे 41.0 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर उद्या, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ येथे दिवसा तर वर्धा, नागपूर, चंद्रपुर येथे रात्री उष्णतेची लहर आल्याचे चित्र असणार आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचाही अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. 


पुढील 48 तास मुसळधार पाऊस


आज राज्यासह देशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार, नव्याने सक्रीय होणाऱ्या वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे हवामानावर (Weather Update Today) परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पर्वतीय भागात वादळी वाऱ्यासह जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज मैदानी भागात हलक्यात ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तर ईशान्य भारतात पुढील 48 तास मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


भंडाऱ्यात अवकाळी पावसाची हजेरी


दिवसभर उकाड्याने असह्य होत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटासह भंडारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील भात पिकांना फायद्याचा झाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या