Vidarbha Rain News : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस (Rain) पडत असला तरी देखील विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पावसाने विदर्भाला (Vidarbha Rain) चांगलीच हुलकावणी दिली आहे. जून महिन्यात संपूर्ण विदर्भामध्ये सरासरीपेक्षा 16 टक्के कमी पाऊस झाला. तर पूर्व विदर्भात पावसाची तूट अजून मोठी असून भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे तर जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पावसाची तूट 40 टक्के आहे. 


पूर्व विदर्भात पावसाची मोठी तूट


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाच्या अपेक्षा आहेत. वरुणराजानं जून महिन्यात केलेल्या निराशेमुळं बळीराजाही चिंतेत आहे. यामुळं शेतीचं गणित बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला उष्ण आणि दमट हवामानामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढलं आहे.


1 ते 30 जून दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसाची तूट किती? 


भंडारा  - 58  टक्के


गोंदिया - 47 टक्के


गडचिरोली - 41टक्के


चंद्रपूर - 22 टक्के


नागपूर - 22 टक्के


 वर्धा - 11 टक्के


 


आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट


दरम्यान, हावामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात येत आहे, मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


साताऱ्यासह पुण्यात जोरदार पावसाची हजेरी


सध्या सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळं कोयना धरणाच्या पाणीसाठ्या वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच चांगल्या पावसामुळं शेतीच्या कामांना देखील वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी पावसामुळं समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे पुण्यात तब्बल 21 दिवसानंतर चांगल्या पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पुणे जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Rain Alert : वरुणराजा बरसणार! आज विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता