Nagpur News : विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना मिळणारी वीज सवलत (Electricity subsidy to industries) बंद होताच स्टील उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. अनुदान बंद झाल्याने कंपन्या अडचणीत आल्या आहेत. एकामागून एक कंपन्या बंद होत आहेत. काही उद्योग राज्य सोडून इतरत्र जात आहेत, तर काहींनी उत्पादन कमी केले आहे. त्याचा थेट परिणाम रोजगार आणि महसुलावर होऊ लागला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पोलाद उद्योग विदर्भ आणि मराठवाड्यासाठी कण्यासारखे होते, पण आता त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याने विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्याच्या औद्योगिकीकरणावर विपरित परिणाम दिसून येत आहे.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) उद्योगांसंबंधिची यादी जाहीर करत वीज सबसिडी बंद केल्यानंतर झालेल्या परिणामांकडे लक्ष वेधले आहे. दोन्ही विभागातील डी आणि डी प्लस क्षेत्रातील 6 उद्योगांनी उत्पादनात लक्षणीय घट केली आहे. 10 औद्योगिक समूह राज्य सोडून इतरत्र गेले आहेत. तब्बल 36 उद्योगांनी शटरच बंद केले आहे. यावरुन रोजगारावर किती विपरित परिणाम झाला त्याचा अंदाज येऊ शकतो. 

देशात सर्वात महाग वीज मराष्ट्रात

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे (VIA) अध्यक्ष विशाल अग्रवाल, उपाध्यक्ष आर. बी. गोयंका यांनी सांगितले की, देशात सर्वाधिक महाग वीज महाराष्ट्रात मिळत आहे. सबसिडी मिळाल्याने दिलासा मिळाला होता, पण आता उत्पादन खर्च फार वाढल्याने उद्योग बंद करण्यातच धन्यता मानावी लागत आहे. शेजारील राज्ये मात्र पुढे जात आहेत. एकीकडे अस्तित्वातील उद्योग काढता पाय घेत आहेत, तर दुसरीकडे नवीन उद्योग येण्यास इच्छुक नाहीत. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, झारखंड, ओडिशा या राज्यांनी उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकून आकर्षित करण्याचे प्रयत्न चालवले आहे. 

उत्पादन कमी करणाऱ्या कंपन्या 

कंपनी जिल्हा पूर्वी लागणारी वीज आता लागणारी वीज
एसएमव्ही इस्पात वर्धा 38,000 केव्हीए 10,000 केव्हीए
राजूरी स्टील अॅण्ड एलॉय चंद्रपूर 6,000 केव्हीए 500 केव्हीए
श्री सिद्धबली स्टील चंद्रपूर 5,000 केव्हीए 1,500 केव्हीए
भाग्यलक्ष्मी स्टील प्रा. लि. जालना 66,000 केव्हीए 45,000 केव्हीए
ओमसाईंराम स्टील प्रा. लि. जालना 45,000 केव्हीए 30,000 केव्हीए
राजूरी स्टील प्रा. लि. जालना 13,500 केव्हीए 10,000 केव्हीए

राज्यातून गाशा गुंडाळणारे उद्योग

कंपनी     स्थळ कुठे गेले
एमआय अलॉय वाडा सिलवासा
केसी फेरो वाडा दमन
बलबील स्टील वाडा वापी
बाबा मुगीपा वाडा छत्तीसगढ
युनायटेड इंजिनीयरिंग वाडा दादर
स्पाईडर मॅन वाडा दमन
सराली नागपूर छत्तीसगढ
मीनाक्षी नागपूर कर्नाटक आणि इंदूर
रिजेंट जालना सिलवासा
गणपती इस्पात - सिलवासा

बंद पडलेले उद्योग

  • अंब्रिश इस्पात
  • माऊली स्टील इंडस्ट्रीज  
  • नीलेश स्टील  
  • भद्रा मारुती    
  • मक्रांती स्टील  
  • महावीर मेटल प्रा. लि.  
  • असोसिएट स्टील  
  • टॉप वर्थ ऊर्जा अॅण्ड मेटल  
  • श्री सुषमा फॉरस  
  • रेड फ्लेम एलॉय  
  • सर्वम स्टील  
  • सुविकास स्टील अॅण्ड एलॉय  
  • अष्टविनायक इस्पात  
  • जय ज्योतावाली स्टील प्रा. लि.  
  • गोयल अलॉयड अॅण्ड स्टील  
  • भुवालका स्टील  
  • भवानी इस्पात  
  • श्री वैष्णव इस्पात  
  • श्री वैष्णव स्टील  
  • विस्तार मेटल  
  • हीरा स्टील
  • हीरा स्टील इंडस्ट्रीज  
  • जय महालक्ष्मी
  • गुरुनानक मेटल वर्क
  • मां चिंतापूर्णी प्रा. लि.
  • श्री विंद्यावासनी आयरन इंडिया
  • रामदद इस्पात
  • प्लाजा स्टील
  • सिल्वर आयरन अॅण्ड स्टील
  • एसडीएम
  • वीर एलॉय
  • विराट इस्पात
  • अरिहंत इस्पात
  • सोला मेटल
  • जय ज्योतावाली
  • सुमो इस्पात

ही बातमी देखील वाचा

Konkan Politics : भाजपचे लक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दोन दिवसीय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा