नागपूर : देशातील प्रत्येक गावात हनुमानचे मंदिर बांधणार असल्याचा निर्धार विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय पदाधिकारी सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केला आहे. हनुमान मंदिर बांधण्यासाठी स्वत: विश्व हिंदू परिषदच पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारला केंद्रात बसावण्यात किंग मेकरची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजावली. आता परत एकदा उत्तर प्रदेश निवडणुकीत संघ परिवार भाजपच्या मदतीला येणार असल्याचे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही विश्व हिंदू परिषदेचा सक्रीय सहभाग असेल, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय पदाधिकारी सुरेंद्र जैन यांनी दिली.
नागपुरात विश्व हिंदू परिषदेची बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले, लोकसभेत जे काम केले, तेच यावेळी उत्तर प्रदेशात करणार आहे.
लोकसभेत मतदान करा, एवढेच सांगणार असे जरी संघाने म्हटले असले, तरी त्यांची भाजपला मोठी मदत झाली. भाजपच्या विजयात संघाचा मोठा वाटा राहिला आहे.
राम मंदिर प्रश्नावर विश्व हिंदू परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अवलंबून नाही. आम्ही समाजात यावर जागृती निर्माण करतो आहे, असेही जैन यांनी सांगितले.