Uttam jankar on Ajit Pawar: गुरुच्या नंतर सभा करायची नसते, म्हणून पंतप्रधान मोदी हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापूर्वी सभा करुन गेल्याचे वक्तव्य उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी केलं. गेल्यावेळी चूक केली म्हणून आता माढा (Madha) जिंकून प्रायश्चित करणार आहे. विठ्ठल आमची काळजी घेईल तोही आमचा देव आहे. तुमच्या पक्षात असताना राम आणि आता तो दहशतवादी असे म्हणत जानकरांनी फडणवीसांना टोला लगावला. दरम्यान, 77 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टांचार केलेल्यांना चुना लावून बगळा केला आहे, असं म्हणत जानकरांनी अजित पवारांवर टीका केली. 


संघर्ष माझ्या रक्तात, अजितदादांसारखे माझे नाही


संघर्ष माझ्या रक्तात आहे. अजितदादांसारखे माझे नाही, गंगेचं पाणी सोडून गटारीचे पाणी प्यायला गेले असेही जानकर म्हणाले. वाचले तर फक्त गडकरी नाहीतर सगळं सुफडा साफ होणार असल्याचे जानकर म्हणाले. सब कुच जल गया अब बाचा क्या है, असे म्हणत जानकरांनी जोरदार टीका केली. 


धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवारांची जाहीर सभा


माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होत आहे. यासाठी जयंत पाटील, राजेश टोपे, बाबासाहेब देशमुख तसेच भूषणसिंह होळकर उपस्थित आहे. 


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात नवा ट्विस्ट! अभिजित पाटील यांनी लोकसभेला भाजपाला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला धक्का