चंद्रपुरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 5 जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 22 Jan 2017 12:43 PM (IST)
चंद्रपूर : मॉर्निक वॉकसाठी गेलेल्या 5 जणांना भरधाव चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर 3 जण जखमी झाले आहेत. चंद्रपुरातील ऊर्जानगरजवळच्या पुलाजवळ आज सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी कार चालकाला अटक केली असून जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.