पुणे : एका शिक्षिकेची व्हॉट्सअॅपद्वारे छेड काढल्याचा प्रकार महिला दिनीच समोर आला आहे. शिक्षिका वर्गात शिकवत असतानाच एका अज्ञात विकृताने नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल केल्याने, खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत 6 मार्च रोजी घडलेली घटना आज समोर आली.
पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षिका इयत्ता दुसरी आणि इयत्ता तिसरीतील विध्यार्थ्यांना शिकवत होत्या. दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांना एका अज्ञात नंबरवरून व्हिडीओ कॉल आला. तो कॉल त्यांनी रिसिव्ह केला असता, व्हिडीओ कालमध्ये एक विकृत नग्नावस्थेत दिसून आला. लगेच त्यांनी तो कॉल कट केला.
अचानक असा प्रकार घडल्यामुळे त्या शिक्षिकेला मोठा धक्का बसला. या घटनेने शाळेत खळबळ उडाली आहे. हा प्रकार शिक्षिकेने घरी सांगताच तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 फेब्रुवारीला हिंजवडीतील आयटी अभियंता तरुणीसोबत असाच प्रकार घडला होता. एका अज्ञात विकृताने व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवरून तिला नग्नावस्थेतील व्हिडिओची मागणी केली होती. सोशल मीडियावरून महिलांच्या छेडछाडीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अज्ञाताचा शिक्षिकेला नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2019 06:58 PM (IST)
एका शिक्षिकेची व्हॉट्सअॅपद्वारे छेड काढल्याचा प्रकार महिला दिनीच समोर आला आहे. शिक्षिका वर्गात शिकवत असतानाच एका अज्ञात विकृताने नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल केल्याने, खळबळ उडाली आहे.

Photo : Getty Images
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -