मुंबई: मुंबई (Mumbai University) आणि पुणे विद्यापीठाला (Pune University) कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.  मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या आणि त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्यानंतर यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवली आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून दोन्ही विद्यापीठांचे कुलगुरूपद हे रिक्त होते. कुलगुरू पदासाठी चर्चेत असलेल्या दोन ते तीन नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे कोणाला कुलगुरुपद मिळतं याकडे लक्ष लागलंय.


मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये 80 जणांनी सहभाग घेतला होता त्यातील 20 जणांच्या मुलाखती या मागील आठवड्यात निवड समितीने घेतल्या त्यानंतर त्यातील पाच नाव ही राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत आणि या पाच नावांपैकी एका नावाची राज्यपाल कुलगुरू म्हणून निवड करतील. तर  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीने 27 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर पाच नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत. 


मुंबई विद्यापीठाची संभाव्य नावं



  • प्रा. रवींद्र कुलकर्णी - मुंबई विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू म्हणून यांनी काम केला आहे

  • सुरेश गोसावी - भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  • तेज प्रताप सिंग - बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक

  • ज्योती जाधव - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट

  • अर्चना शर्मा - भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर 


पुणे विद्यापीठाची संभाव्य नावं



  • डॉ. पराग काळकर -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता  

  • प्रा. अविनाश कुंभार - विद्यापीठातील रसायनशास्त्र  विभाग

  • डॉ.संजय ढोले - भौतिकशास्त्र विभाग

  •  प्रा. सुरेश गोसावी - पर्यावरण शास्त्र विभाग

  • डॉ. विजय फुलारी -  कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग 


मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ 10 सप्टेंबर 2022 रोजी संपुष्टात आल्यानंतर पद रिक्त झाले होते. यानंतर कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 जानेवारी 2023 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डी.पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांचा समावेश आहे.


हे ही वाचा :


बारावीचा निकाल लागताच आता मिशन अॅडमिशन, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर