मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 685 उमेदवारांपैकी 60 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 10 टक्के महाराष्ट्रातील आहेत. या वर्षीच्या निकालात महिलांनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातूनही महिला उमेदवार पुढे आहेत. राज्यातून प्रियंवदा म्हडाळकर प्रथम तर अंजली श्रोत्रीय यांचा दुसरा क्रमांक आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार या दोघी 13 व्या आणि 44 व्या क्रमांकावर आहेत.


पहिल्या शंभरामध्ये पाच महाराष्ट्रातले
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2021 च्या परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 5 पाच उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रियंवदा म्हडाळकर  (13) अंजली श्रोत्रीय (44),  श्रध्दा गोमे (60), शुभम अशोक भैसारे (97), अंकित हिरडे (98) अशी त्यांची नावं आहेत.


इतर यशस्वी उमेदवार
आदित्य काकडे (129), शुभम भोसले (149), विनय कुमार गाडगे (151), ओंकार पवार (194), रामेश्वर सब्बनवाड (202), अक्षय वाखरे (203), अक्षय महाडिक (212), तन्मयी देसाई (224), अभिजीत पाटील (226), तन्मय काळे, (230), विशाल खत्री (236), संचित गुप्ता (237), उत्कर्ष खंडाळ (243), मृदुल शिवहारे (247), इशान टिपणीस (248), प्रतीक मंत्री (252), सुयश कुमार सिंग (262), सोहम मांढरे(267), अश्विन राठोड़ (265), अर्शद मोहम्मद (276), सागर काळे (280), रोहन कदम (295), रणजित यादव (315)  गजानन बाळे (319), वैभव काजळे (352), अभिजीत पठारे (333), राहूल देशमुख (349), सुमित रामटेके (358), विनायक भोसले (366),आदित्य पटले (375), स्वप्न‍िल सिसळे (395),सायली म्हात्रे (398), हर्षल महाजन (408), शिवहर मोरे (409), चेतन पंढेरे (416), स्वप्न‍िल पवार (418), पंकज गुजर (423), अजिंक्य माने (424), ओंकार शिंदे (433), रोशन देशमुख (451), देवराज पाटील (462), अनिकेत कुलकर्णी (492),  शिल्पा खानिकर (506), अस्मर धनविजय (558), नितीश डोमले(559), निरज पाटील (560), आकांक्षा तामगाडगे (562), आशिष पाटील (563), शुभम नगराळे (568), अमीत शिंदे (570), स्वप्न‍िल माने (578), प्रशांत डगळे (583), अभय सोनारकर (620), अश्विन गोलपकर (626), मानसी सोनवणे (627), अमोल आवटे (678), पुजा खेडकर (679).


केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2021 मध्ये परीक्षा घेण्यात आली. जानेवारी  2022 मध्ये  मुख्य लेखी परीक्षा घेण्यात आली असून एप्रिल-मे 2022 महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 685 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (खुला) गटातून –244, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 73, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 203, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 105, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 60 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 26 दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 126 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 63, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 20,  इतर मागास वर्ग -36, अनुसूचित जाती- 07, अनुसूचित जमाती  - निरंक  उमेदवारांचा समावेश आहे.