Narayan Rane Criticizes Uddhav Thackeray: कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. याचपार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच जुंपल्याचं पाहायला मिळतंय. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. महाराष्ट्राला आजारी मुख्यमंत्री लाभले, नामदारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको. त्यांनी राज्याला 10 वर्ष मागे नेलंय, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
"कुडाळच्या जनतेला सुखाने, आनंदाने जगण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. विरोधकांनी गेल्या अडीच वर्षांत एक तरी चांगलं काम केलं तर सांगा. विरोधक भाषणावर विकासावर बोलत नाही. नारायण राणे आणि कुटुंबियांवर टीका करीत आहेत. मत मागायचा मला अधिकार आहे. कारण माझ्या कुडाळ मधील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी काम केलं. त्यामुळं मला मत मागायचा अधिकार आहे. लोकांची सेवा करत आहोत", असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
" जिल्ह्यातील 400 शिक्षक, मेडीकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज मी आणले. तुम्ही एक तरी बालवाडी काढली. खासदार रात्रीचा दिसत नाही. शिवसेना खोटं बोलतेय आणि उद्धव ठाकरे गप्प बसतायेत. चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी आणि सुरेश प्रभू यांनी केलं. याविरोधात शिवसेनेनं त्यावेळी आंदोलन केलं. 2014 साली विमानतळ बांधून पूर्ण केलं. मात्र, सुरू करायला किती वर्षे गेली पहा. योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, मी केंद्रात मंत्री झालो. त्यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची खासदार विनायक राऊत यांनी 7 तारीख जाहीर केली. मी हवाई मंत्री जोतीरादित्य सिंधियाना भेटून 9 ऑक्टोबरला जाहीर केली. विमानतळ सुरू केलं म्हणून खासदार विनायक राऊत विमानात पेढे वाटत होते. उद्धव ठाकरे बार भरून उभे होते. मला पाहून म्हणाले आज भांड फोडणार का विचारलं? मी म्हटलं स्टेजवर फोडणार. मी भाषण सुरू केलं. हे विमानतळ सुरू कोणी केलं ते स्टेजवर जाहीर सांगितलं. हे विमानतळ नको म्हणून विनायक राऊत आंदोलन करतायेत, त्यावेळी त्यांची बेईजत काढली आणि बसलो, असंही राणे म्हणाले आहेत.
पुढे राणे म्हणाले की, "सी वर्ड साठी 100 कोटी मी आणले. मात्र ते पैसे खर्च केलं आणि सी वर्ड रद्द केला. सिंधुदुर्ग किल्यावर रोषणाई करायचं ठरवलं सिंगापूरप्रणानं आणि अमेरिकेप्रमाणे डीझनी मालवणला जागा राखून ठेवली. मात्र, हे आले आणि रद्द केलं. या सरकारनं मोठे प्रोजेक्ट रद्द केले. माझं आयुष्य जेवढ आहे तेवढ जगणार, धमक्या आम्हाला देऊ नका. धमक्या द्यायला रक लागते. विरोधक माझं काही करू शकत नाहीत. शिवसेना कुठे आहे का चिवसेना आहे. चिपी विमानतळावरून कुडाळ ला येताना गाडीत बसलो की होडीत बसलो समजत नाही. मुंबईतुन विमानानं येताना न हलत येतो. मात्र, पुढे जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय. मला व्हॅल्यू ऍडेड प्रोजेक्ट पाहिजेत. म्हणून पदभार स्वीकारला आणि लगेच काम सुरू केलं. उद्योगमय सिंधुदुर्ग जिल्हा करणार. जिल्ह्यातील लोकांनी व्यवसाय करावा असं वाटत. विरोधात सत्ता मिळत नसल्याने माझ्यावर टीका करतात."
एवढ्या महिन्यात केंद्रातील मंत्री मित्र झालेत. संचयनी संदर्भात येत्या काही दिवसांत केंद्रातून लवकरच निकाली लावणार. खासदार विनायक राऊतांचा मुलगा रेडी पोर्ट मध्ये महिन्याच्या सुरवातीला हप्तेखोरीसाठी उभा असतो. जगाच्या पाठीवर आमच्या पंतप्रधानांच नाव आहे. देशाला आत्मनिर्भर बनवणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतायेत. आम्ही मताची भीक मागायची गरज नाही, आम्ही मताचा मोबदलला मागू. आम्हाला सेवा करायची, विकास करायची आहे म्हणून आम्हाला सत्ता द्या. मोदींनी केलेली काम लोकांपर्यंत घेऊन जा, मतदारांसमोर विनम्र व्हा, मत मागा लोक मत देतील. कुडाळ मध्ये 13 पैकी 13 नगरसेवक निवडणून आले पाहिजेत, राणे म्हणाले.
कुडाळ नगरपंचायत मध्ये आमच्या समोर लगानची टीम आहे. आमची टीम चांगली आहे. आज राजकारणी म्हणून बोललो नाही. तुमच्या घरातील एक व्यक्ती आहे म्हणून बोललो. तुमचे माझे जे संबंध आहेत ते दादा म्हणून हाक मारत म्हणून तुमच्या भावना दुखवू शकत नाही. विरोधकांच्या चेहऱ्यावर जेवढे खड्डे आहेत, तेवढे जिल्ह्यातील रस्त्यावर खड्डे आहेत. मुख्यमंत्री आजारी आहेत, घरी आहेत. राज्याला मुख्यमंत्री हवा तसा मिळाला नाही हा नामदारी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राला १० वर्ष मागे नेलं, अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha