अहमदनगर : अहमदनगर येथे दांपत्याला अर्धनग्न करून मारहाण करून व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना राज्यभर गाजत असताना या घटनेबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मारहाण झालेल्या दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने स्वतः हा व्हिडिओ केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी समोर आणली आहे.


मारहाण झालेल्या दाम्पत्यातील पीडित महिलेने 2016 साली सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी मित्रांच्या मदतीने मारहाण केल्याचा बनाव करत व्हिडिओ करून जास्तीचे पैसे उकळण्यासाठीच या दाम्पत्याने हा प्रताप केला होता. तशी कबुलीच दाम्पत्यासह हा व्हिडिओ बनवण्यात सहभागी असलेल्या तिघांनी दिली आहे. या प्रकरणात तपासासाठी अहमदनगर पोलिसांनी वरिष्ठ पातळीवरचे वेगवेगळे पथके तयार करून या प्रकरणाचा छडा लावला.  दाम्पत्यासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आता गुन्हा नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर येथे एका दाम्पत्याला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात 10 जणांवर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  मारहाण झालेल्या महिलेने 2016 मध्ये मारहाण करणाऱ्यांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी ही मारहाण केली असल्याचं पीडित महिलेने या फिर्यादीत म्हटले होते.

Mumbai Crime | भावाकडून बहिणीच्या पतीची हत्या, पत्नीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून मारलं | ABP Majha



संबंधित बातम्या : 

Pune Crime | पुण्यात पैलवानांचा धिंगाणा; सोसायटीत घुसून तिघांना मारहाण | ABP Majha