सातारा : साताऱ्यातील भुईंज परिसरात पुणे-बंगळुरु महामार्गावर बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

कोसळलेल्या पुलाच्या ढिगाऱ्याखालून तीन मजुरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र आणखी काही मजूर अकडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.



स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

 

दरम्यान, पुलाचं बांधकाम पूर्ण करण्याची मुदत संपली होती अशी माहितीही समोर आली आहे.