उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून तरुणाची भोकसून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2016 02:52 AM (IST)
कल्याण : उल्हासनगरमध्ये एका 32 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दीपक संसारे असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सी ब्लॉक जवळच्या कलानी कॉलेज रोडवरील शिव मंदिर परिसरात मंगळवारी रात्री 5 ते 6 जणांनी दीपक संसारेची धारदार शास्त्राने हत्या केली या घटनेबाबत कळताच शहरातील नागरिकांनी नेहरु चौकातील रस्त्यावरील 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या हत्येचा तपास करत आहेत.