Shiv Sena MLA disqualification case : अंतिम निर्णय हा जनतेच्या मनातला होईल, असे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case) बुधवारी निर्णय येणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बरोबर होते का उद्धव ठाकरे (uddhav thackeray) हे  जनता ठरवेल, असेही उल्हास बापट म्हणाले. जर आमदार अपात्र झाले तर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत. बहुमत कोणालाच न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते, असेही बापट यांनी सांगितलं.  


उल्हास बापट काय म्हणाले ?


मागील वर्षभरापासून सांगतोय अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे. जनता ठरवेल शिंदे बरोबर होते की उद्धव ठाकरे बरोबर होते. लोकशाहीमध्ये जनता जो निर्णय घेईल, त्यावर कुणीच काही बोलणार नाही. पण कुणालाच बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू शकते. जर राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात. तोपर्यंत सर्व सत्ता राज्यपालांच्याच हातात राहते. म्हणजे सत्ता पंतप्रधानांच्या हातात राहील, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं.