मुंबई : कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) नेमलेल्या 2 समितींच्या शिफारसीनुसार महाविद्यालयीन, विद्यापीठाचे नवे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करावे अशी शिफारस करण्यात आली आहे. तर दुसऱ्या परीक्षेसंदर्भात नेमलेल्या समितीने या महाविद्यालय, विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी विद्यापीठाने करावी किंवा ऑनलाइन परीक्षा शक्य नसल्यास लॉकडाऊन मागे घेण्याची प्रतीक्षा करून त्यानुसार पेन पेपरद्वारे नेहमीप्रमाणे ऑफलाइन परीक्षा घेण्याची तयारी करावी व त्यानुसार परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात.


यामुळे आता देशभरातील महाविद्यालये व विद्यापीठांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे जून जुलैमध्ये सुरु होण्याऐवजी सप्टेंबरपर्यंत सुरु करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. आयोगाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतरच समितीच्या अहवालावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केल्यामुळे युजीसी आता अहवालावर नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, परीक्षा, ऑनलाईन अभ्यासक्रम याचा अभ्यास करण्यासाठी यूजीसीमार्फत दोन समित्यांची नेमणूक करण्यात आली होती. महाविद्यालये व विद्यापीठांचे पुढील शैक्षणिक वेळापत्रक कसे असू शकेल आणि या काळात परीक्षा घेण्यासंबंधी उपलब्ध पर्याय यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. तर ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा कसा असावा ? कसा सुधारता येईल याचा अभ्यास करण्यासाठी दुसरी समिती नेमण्यात आली होती. या दोन्ही समित्यांनी त्यांचा अहवाल शुक्रवारी सादर केला आहे. या दोन्ही अहवालांचा अभ्यास करून देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना अधिकृत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येतील अशी माहिती मिळाली आहे.


जेईई , नीटसारख्या प्रवेश परीक्षा जूनमध्ये परिस्थिती पाहूनच...


लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या प्रवेशपरीक्षा या नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्यातील अडथळा ठरू शकतात. नीट , जेईई सारख्या प्रवेश परीक्षा जूनपर्यंत घेण्याचा मानस असला तरी देशातील व राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्याचा विचार करूनच मार्गदर्शक तत्त्वे जरी केली जाण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या :








कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरचं स्वगृही

Coronavirus | Oxford University | ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लसीची मानवी चाचणी