मुंबई : राजस्थान राज्यातील कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरच घरी परतणार आहेत. या संदर्भांत राज्याने विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याला पत्राद्वारे कळवलं आहे. कोटामध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे जवळपास दीड हजार ते दोन हजार महाराष्ट्रीयन विद्यार्थी अडकले आहेत. कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


राजस्थानमधून निघून मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून प्रवास करून महाराष्ट्रात येणार आहे. या विषयी राज्याने संबंधित राज्यांना पत्राद्वारे कळवले आहे. राज्यात परतल्यानंतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे.



तसेच राजस्थानच्या कोट्यातून महाराष्ट्राच्या 1800 विद्यार्थ्यांना लवकरच परत आणणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.





राजस्थान कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास 1500-2000 विद्यार्थी लॉकडाऊन मुळे अडचणीत अडकले होते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परतायची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सत्यजीत तांबे यांना ट्विट करून दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती दिली. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे, सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.


संबंधित बातम्या :


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय : शिक्षण मंत्री उदय सामंत


Kota Rajasthan | राजस्थानच्या कोटा शहरात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, खानवळ बंद असल्याने उपासमारीची वेळ