पनवेल : रिकाम्या खुर्च्यांशी संवाद साधूनही मुख्यमंत्र्यांनी सत्ता स्थापन केली, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपवर निशाणा साधला. पनवेल महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पनवलेमध्ये आज शिवसेनेचे सभा होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

प्रबोधनकार घडले याच पनवलेमध्ये. आमचं घराणंही पनवलेचंच, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय, पनवेल महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

कोणाच्या मेहेरबानीवर जागा नको, तुमच्या आशीर्वादानं हव्या आहेत. जनतेसमोर पदर पसरेन, पण भाजपसमोर पसरणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवाय, भाजपने भ्रष्टाचाऱ्याला पक्षात घेऊन वाल्याचा वाल्मिकी केला, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीच्या सभांना मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये, अशी निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • मोदी म्हणाले बिहारमध्ये सव्वा लाख कोटी देईन. अहो, सव्वा रुपया तरी दिला का?

  • आश्वासनांना भाळून शेतकऱ्यांनी मतदान केलं. आज तेच शेतकऱ्यांना आत्महत्या करत आहेत.

  • गरिबांच्या मनात राग धुमसतोय, निवडणुकीचे आकडे फसवे आहेत.

  • नोटबंदीनंतर काळा पैसा तसाच आहे, हल्ले होत आहेत. मग नोटाबंदीचा फायदा काय?

  • मुंबई-पुणे ही शहरं स्मार्ट आहेतच आणि ही तुम्ही नाही केली आम्ही केली आहेत. म्हणून लोकांनी शिवसेनेला मतं दिली.

  • स्मार्ट सिटीमध्ये पनवेल, जळगाव का नाही?