Uddhav Thackeray Speech Top 10 Points : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अभूतपूर्व दिवस असून शिवसेनेचा प्रसिद्ध दसरा मेळावा पार पडत आहे. यावेळी उद्धव ठाकरे शिवाजी पार्क येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत उपस्थित असून दुसरीकडे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गटाच्या लोकांसोबत उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या आधी भाषण करत उपस्थित सर्वांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आधी उपस्थितांचे आभार मानत एकनाथ शिंदेसह संपूर्ण शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर मोदी, अमित शाह यांच्यावरही ठाकरेंनी टीका केली. तर त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे पाहूया...



  1. सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सर्वांसमोर नतमस्तक होत नमस्कार केला. यावेळी त्यांनी उपस्थिताचं कौतुक करत 'ही कोरडी गर्दी नाही, ही अंत:करणातून आलेली गर्दी आहे '' असं भावनिक वक्तव्य केलं.

  2. त्यानंतर भाषण चालू होताच ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. सर्वात आधी 'यंदाचा रावण वेगळा आहे, आतापर्यंत 10 तोंडांचा रावण होता, आता 50 खोक्यांचा बकासूर आहे.' असं वक्तव्य ठाकेरेंनी केली.

  3. त्यानंतर पुढे भाजप-सेना युतीबद्दल बोलताना उद्धव यांनी आमच्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं, असं म्हणत ठाकरे यांनी त्यांच्या आई-वडिलांची शपथही घेऊन मी खरं बोलतोय असं म्हटलं.

  4. त्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत बोलतना 'शिवसैनिकांना धमकावण्याचं काम सुरु, जर शिवसैनिकांवर अन्याय कराल तर तो सहन करणार नाही, तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा' अस ठाकरे म्हणाले. तसंच ''आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची'' असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

  5. पुढे जाऊन उद्धव यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. फडणवीसांना वाटतं मी त्यांना टोमणे देतो असं म्हणत थोडी मजेशीर लहेजात टीका केली.  'फडणवीस एक सभ्य गृहस्थ आहेत. ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार होते, आले पण दीड दिवसांत त्याचं विसर्जन झालं आताही त्यांना जबरदस्ती उपमुख्यमंत्री बनावं लागलं आहे, असं ठाकरे म्हणाले.

  6. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत ''ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप 'आमच्या गटात या अन्यथा केसेस काढतो' असं म्हणत धमकावत आहेत. 'देशातील सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरु' असल्याचंही ठाकरे म्हणाले.

  7. ठाकरे यांनी यावेळी देशभरातील महागाईच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. भाजप गाईवर बोलतं, पण त्यांनी महागाईवर बोललं पाहिजे, असं ते म्हणाले. 2014 ला मोदी सरकार आल्यापासून रुपया घसरत असल्याने ही देशाची घसरण असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

  8. अमित शाह यांच्यावर टीका करत असताना उद्धव यांनी 'शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे असा सवाल विचारत टीकास्त्र सोडलं. देशाची काम करण्यापेक्षा ते निवडणूकांवेळी राज्य फिरत बसतात, असंही ते म्हणाले. तसंच भाजपने आम्हाला पाक व्याप्त काश्मिर पुन्हा घेऊन दाखवावा, मग आम्ही स्वत: आधीप्रमाणे भाजपला डोक्यावर घेऊ असंही ठाकरे म्हणाले.

  9. शिंदे गट आणि भाजप सरकारवर टीका करताना ''या सरकारला उद्या शंभर दिवस होतील त्यात 90 दिवस दिल्लीवारीत गेले  गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा अशी सरकारची अवस्था, असल्याचंही ठाकरे म्हणाले.

  10. अखेर उपस्थितांना धन्यवाद करताना जे झालं ते चांगलच झालं असं म्हणताना शिंदे गटाला बांडगुळ म्हणत ते छाटले गेले हे चांगलचं झालं असं ठाकरे म्हणाले. तसंच सर्वांच्या साथीने पुन्हा आपण सत्ता आणू आणि पुन्हा सेनेचा मुख्यमंत्री करु, असं ते म्हणाले.


महत्वाच्या बातम्या