Uddhav Thackeray Dasara Melava Live : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार : उद्धव ठाकरे

Shiv Sena Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मशाल पेटवणार आहे.तोफेच्या तोंडी कोण कोण राहणार याची उत्कंठा लागली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Oct 2024 08:42 PM
Uddhav Thackeray : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार : उद्धव ठाकरे


Uddhav Thackeray : आमचे सरकार आल्यानंतर धारावीचे टेंडर रद्द करणार आहे. आमचे सरकार आल्यानंतर धारावीमध्ये पोलीसांना, गिरणी कामगारांना, जी मराठी माणसे तुम्ही मुंबईतून हद्दपार करत आहेत . त्या सर्व मराठी माणसांना धारावीत आणेल आणि त्यांना जागा देईल : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  'जय शिवराय' हा महाराष्ट्राचा मंत्र : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  छत्रपती शिवाजी महारज आमचे आमचे दैवत आहे. जसे आम्ही 'जय श्रीराम' म्हणतो तसेच 'जय शिवराय' म्हणतो. 'जय शिवराय' हा महाराष्ट्राचा मंत्र! : उद्धव ठाकरे

 Uddhav Thackeray:  भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणायला लाज वाटली पाहिजे : उद्धव ठाकरे

 Uddhav Thackeray:   आत्ताचे भाजप हायब्रीड झालेला आहे... सगळे इतर पक्षाचे नेते भाजपच्या गर्भात घुसले आहेत आणि तो भाजप आमच्यावर राज्य करणार? एवढा वाईट विचार आजवर कोणी दिलेला नव्हता. भारतीय जनता पक्षाला भारतीय म्हणायला लाज वाटली पाहिजे आणि जनतेचा तो पक्ष राहिलेला नाही.  : 

Uddhav Thackeray :  अमित शाहाजी तुमच्या बोंडावर गुलाबी जॅकेटवाली अळी पडलीय : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  अमित शाहाजी तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावर गुलाबी जॅकेटवाली अळी पडलीय ती बघा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray:  आमचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी  महाराजांचे  मंदिर बांधणार : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray:  आमचे सरकार आल्यानंतर  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी  महाराजांचे  मंदिर बांधणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Uddhav Thackeray : भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  तुम्ही सर्व माझी शस्त्र... ही शिवसेनाप्रमुखांनी मला दिलेली वाघनखं. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

आदित्य तुम्ही लहान राहिलेला नाहीत, महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली लढायला तयार : संजय राऊत


 शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे असं मी मानतो .  आदित्य तुम्ही म्हणालात वडिलांसमोर भाषण केलं नाही असं तुम्ही सांगितलं मात्र इतकंच सांगतो आपण लहान मुल राहिलेला नाहीत, महाराष्ट्र आपल्याकडे फार अपेक्षेने पाहातो. लढणार का तुम्ही विचारलं तेव्हा ठाकरेंच्याच मागे महाराष्ट्र उभा राहिलेला आहे.  महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली लढायला तयार आहे. मशालीसारखं चिन्ह दुसरं कोणतं नाही, असे संजय राऊत म्हणाले.  

Aaditya Thackeray :  14  वर्षात मी भाषण केलं नाही; हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray :  पहिल्यांदाच दसरा मेळाव्याला संबोधित करतोय.  दसऱ्याला काय तर आज्याचं भाषण नंतर वडिलांचे भाषण ऐकायला .  बाबासाहेबांनी बळ दिलं आणि तलवार दिली आणि युवासेना इथेच उभी केली य  शिवसेना नेता, युवासेना प्रमुख म्हणून येत असतो . 14  वर्षात मी भाषण केलं नाही .  मात्र उद्धव साहेब आले की मी थांबणार आहे . हे साल महत्त्वाचे, ही लढाई महत्त्वाची आहे 

Uddhav Thackeray at Shivaji Park :  उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मैदानात, थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात

Uddhav Thackeray at Shivaji Park :  उद्धव ठाकरे शिवाजी पार्क मैदानात पोहचले. थोड्याचा वेळात भाषणाला सुरुवात होणार आहे

Sushma Andhare :   लाडक्या बहि‍णींनी 1500 रुपये हक्काने घ्यावेत : सुषमा अंधारे

Sushma Andhare :  फडणवीसांनी नागपूरचा बंगला किंवा शिंदेंनी तापोळ्याची जमिनी विकून 1500 दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे टॅक्सचे पैसे आहेत.  लाडक्या बहि‍णींनी 1500 रुपये हक्काने घ्यावेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या  

Dasara Melave Live:  उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचे पाहा लाईव्ह

Dasara Melave Live:  दादर शिवाजी पार्क मैदानात ठाकरे गटाचा दसरा मेळाव्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्री बंगल्यावरुन थोड्याच वेळात रवाना होणार आहे. 


पाहा लाईव्ह 


 


 Snehal Jagtap : महाड विधानसभा मी लढणार : स्नेहल जगताप

 Snehal Jagtap : भरत गोगवले यांनी जे शब्द वापरले त्यावरून महायुतीचा खरा चेहरा समोर आला. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे शिवीगाळ करायची. मी दोन वर्षापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षात आले आहे. महाड विधानसभा मी लढणार आहे., असे स्नेहल जगताप म्हणाल्या. 

Dasara Melava: शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कसा असेल ?

  • ठाकरेंचा दसरा मेळावा हा दरवर्षीप्रमाणे एक प्रकारे पारंपारिक सोहळा असेल

  • शिवतीर्थवर येणाऱ्या साधारण  हजार कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या टाकण्यात येतील 

  • शिवाजी पार्क मैदानाबाहेर सुद्धा एलईडी लावण्यात येतील जेणेकरून शिवाजी पार्कवर सुरू असलेली भाषण ऐकता येतील

  • सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची भाषणे होतील 

  • प्रथेप्रमाणे शिवतीर्थावर शस्त्रपूजन सोने वाटप आणि रावण दहन होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  भाषणांना सुरुवात होईल

  • आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दसरा मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाकडून रणशिंग फुंकले जाईल 

  •  आगामी विधानसभा निवडणूक, सध्याची राजकीय परिस्थिती, राज्यातील महिला सुरक्षा, हिंदूत्व, राज्य सरकारच्या योजना आणि निर्णय, राज्यातील प्रकल्प या सगळ्या संदर्भात मुद्दे  उद्धव ठाकरे आजच्या भाषणात घेण्याची शक्यता आहे. 

Shivaji Park : "पंधराशे रुपयाची भीक नको, सुरक्षा हवी" , शिवसैनिकांच्या बॅनरने वेधलं लक्ष

Shivaji Park : शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचत आहेत. यामध्ये संगमनेरवरून आलेल्या याकूब मोमिन आणि त्यांची मुलगी आजीज मोमीन हे सर्वांचाच लक्ष वेधून घेत आहेत. पंधराशे रुपयाची भीक नको, सुरक्षा हवी बदलापूर सारख्या घटना नको, मुख्यमंत्री ठाकरे व्हायला हवेत अशा आशयाचे बॅनर लावून ते दसरा मेळाल्यात आलेत. 

Shivaji Park : दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी

Shivaji Park : शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी होताना पहायला मिळतेय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत  

Uddhav Thackeray: उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी  शिवसैनिक  रवाना

Uddhav Thackeray:  उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी  शिवसैनिक  रवाना झाले आहेत.  शिवसैनिक वाशीतून ट्रेन ने प्रवास करत जाणार उध्दव ठाकरे यांच्या सभेसाठी जाणार आहे. लोकसभेला चांगले यश मिळाल्याने विधानसभेलाही महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.  उध्दव ठाकरे परत एकदा मुख्यमंत्री बनणार असल्याची शिवसैनिकांना आशा आहे.  

Shiv Sena Uddhav Thackeray Melava : शिवाजी पार्कच्या परिसरातही वातावरण ढगाळ

Shiv Sena Uddhav Thackeray Melava : ठाकरेंचा मेळाव्यासाठी लगबग वाढली आहे. शिवाजी पार्कच्या परिसरातही वातावरण ढगाळ झालंय..  

Aaditya Thackeray : यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेही भाषण करण्याची शक्यता

Aaditya Thackeray : यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेही भाषण करण्याची शक्यता आहे.  संजय राऊत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, नितीन बानुगडे पाटील ठाकरेंच्या मेळाव्यात भाषण करणार आहे.  

पार्श्वभूमी

Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava 2024  : शिवाजी पार्कवर होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी होताना पहायला मिळतेय. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.