मुंबई : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) जोरदार तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (UBT) 23 जागांवर दावा केलाय. शिरूरची जागा राष्ट्रवादीसाठी (NCP, Amol Kolhe) सोडून ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) आग्रही आहे. तर अकोलाची जागा वंचितला देण्याची तयारीही शिवसेनाने केली आहे. शिवसेना आपली ताकद असलेल्या अमरावतीची जागा सोडून अकोला जागा वंचितला देण्याची तयारीत आहे. पण शिवसेनेना दावा केलेल्या 23 लोकसभा मतदारसंघात सध्या कोणते खासदार आहेत.. कोणत्या पक्षाने तिथे विजय मिळवलाय, ते पाहूयात...
जागावटपाचा फॉर्मुला ठरला ?
इंडिया आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी या 23 जागा लढण्यावर ठाम आहे. इतकेच नाहीतर महाविकास आघाडीचा लोकसभेचा पहिल्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेना 23, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 15 आणि काँग्रेस 10 असा हा फॉर्म्युला आहे. दुसरीकडे जागावाटपावरुन वाद होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या वचिंत आघाडीनेही एक फॉर्म्युला महाविकास आघाडीला दिला आहे. वंचितने 12-12-12-12 असा फॉर्मुला महाविकास आघाडीला दिलाय. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि वंचित या सर्वांनी प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असं आंबेडकरांचं म्हणणं आहे.
शिवसेनेने दावा केलेल्या 23 जागांवर विद्यमान खासदार कोण?
1) रामटेक - कृपाल तुमाणे (शिंदे गट)
2 ) बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिंदे गट)
3) यवतमाळ वाशिम - भावना गवळी (शिंदे गट)
4) हिंगोली - हेमंत पाटील (शिंदे गट)
5) परभणी - संजय जाधव (उद्धव ठाकरे गट)
6) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
7) छत्रपती संभाजीनगर - इम्तियाज जलील (एमआयएम)
8) नाशिक - हेमंत गोडसे (शिंदे गट)
9) पालघर - राजेंद्र गावित (शिंदे गट)
10) कल्याण - कल्याण श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
11) ठाणे - राजन विचारे (उद्धव ठाकरे गट)
12) मुंबई उत्तर पश्चिम - गोपाळ शेट्टी (भाजप)
13) मुंबई दक्षिण - अरविंद सावंद (उद्धव ठाकरे गट)
14) मुंबई ईशान्य - मनोज कोटक (भाजप)
15) मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिंदे गट)
16) रायगड - सुनिल तटकरे (राष्ट्रवादी, अजित पवार गट)
17) रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत (उद्धव ठाकरे गट)
18) मावळ - श्रीरंग बारणे (शिंदे गट)
19) शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिंदे गट)
20) धाराशिव - ओमराजे निंबाळकर (उद्धव ठाकरे गट)
21) कोल्हापूर - संजय मंडलिक (शिंदे गट)
22) हातकणंगले - धैर्यशील माने (शिंदे गट)
23) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
जागावाटपाच्या अंतिम चर्चेमध्ये काही जागांवर फेरफार होऊ शकतो, मात्र या 23 जागांवर ठाकरे गट ठाम असल्याची नेत्यांची माहिती आहे.
2019 आणि 2024 ची परिस्थिती वेगळी -
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मागील दोन वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. दोन गट तयार झाले. अजित पवार यांनी वेगळी वाट धरली तर एकनाथ शिंदे यांनीही बंड केले. त्यामुळे राज्यातील परिस्थिती सध्या पूर्णपणे वेगळी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना 2019 मध्ये लोकसभेत मोठं यश मिळालं नव्हतं. काँग्रेसला फक्त चंद्रपूर येथील एका जागेवर विजय मिळाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चार जागांवर विजय मिळवता आला होता. शिवसेनेने 18 जागा जिंकल्या होत्या.
आणखी वाचा :