धाराशिव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांची आज (8 मार्च) धाराशिवमध्ये सभा झाली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गटावर घणाघाती प्रहार चढवला. अमित शहा आणि पीएम मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीकास्त्र सोडले. ही लढाई वाघ विरुद्ध लांडगे, निष्ठावान विरुद्ध बेईमान असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी आदित्य आणि तेजस ज्यांना काका काका म्हणत होते, ती घरातील माणसं फिरल्याचे म्हणत भावनिक वार केला.
माझ्या शिवसेनाविरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला
उद्धव ठाकरे म्हणाले की, नार्वेकर (राहुल नार्वेकर) आज मी आरोपच करत आहे, तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून माझ्या शिवसेनाविरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला हा माझा आरोप आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलं आहे की, तुम्ही म्हणजे त्या लवादाने जो काही निकाल दिलेला आहे निर्णय दिला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही का? आज सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे. पण एवढे निर्लज्ज आहेत. भाजप काय मिंधे काय, दुसरे ते गेलेले 70 हजार कोटी वाले काय ही सगळी
पण घरातील माणसं फिरली, उद्धव ठाकरेंचा भावनिक वार
त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी माणसं आपली होती. ज्यांना खरोखर मी माझ्या लहानपणापासून बघत आलो. काही जणांना त्यांच्या लहानपणापासून बघत आलो. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना भरभरून दिलं आम्ही त्यांना भरभरून दिलं. घरातील कुटुंबियांसारखे त्यांच्याशी मी वागलो. अगदी आदित्य काय, तेजस काय त्यांना सुद्धा काका काका म्हणून बोलता बोलत होते. एवढा उलटा फिरतो? आणखी मी काय देऊ? असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, एक गोष्ट खरी आहे की माझ्या मनात कधीही मुख्यमंत्रीपद नव्हते. परिस्थिती अशी निर्माण झाली की भारतीय जनता पक्षाने आपल्याला दगा दिला. पाठीत वार केला. ते म्हणाले की, मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो अमित शाह यांनी बाळासाहेब यांच्या खोलीत जिथे आम्ही त्याला मंदिर मानतो, त्या खोलीमध्ये मला हा शब्द दिला होता. त्यांनी दगा दिला, पण मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं. मी प्रत्येक वेळेला सांगतो की हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख ही ओळख तर मला आहेच, जगाला त्यांची ओळख आहे, पण पहिल्यांदा मी माझे वडील म्हणून त्यांना मी पाहिलं आहे. माझं पुत्र कर्तव्य म्हणून मी त्यांना सांगितलं होतं.
मी त्यांचा हातात हात घेऊन सांगितलं होतं...
त्या शेवटच्या काळामध्ये कारण मी पुत्र म्हणून जबाबदारी घेतली हे मला सांगायचं होतं. मी त्यांचा हातात हात घेऊन सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका एक ना एक दिवस आपल्या शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. मी मुख्यमंत्री होईल माझं वचन नव्हतं. त्याच्यामुळे माझं वचन अजूनही अपूर्णच आहे. मला शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा करायचाच आहे, कारण माझं वचन मी बाळासाहेबांनी दिलेलं आहे आणि ते वचन मला असं वाटलं होतं की तेव्हा भाजप पूर्ण करेल. त्यांनी तर नालायकपणा केला. आता हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती सोपवत आहे. हे कसे वागतात याची तुम्हाला कल्पना आहे. अगदी आता त्यांच्यासोबत गेलेले आहेत बच्चू कडू पासून सगळे हे सांगता आहेत भाजप जो आहे तो वापरा आणि फेकून द्या असा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या