Uddhav Thackeray On Ram Mandir : 22 जानेवारी रोजी नाशिक येथील काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) आरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच या कार्यक्रमाचे राष्ट्रपती मुर्मू यांना आमंत्रण देणार असल्याचेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. काळाराम मंदिरातील रामाच्या प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 


पंतप्रधान म्हणतायत हा दिवस दिवाळी झाली पाहिजे. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, पण त्यानंतर दिवाळं निघालं त्यावर सुद्धा चर्चा करा, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 


राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सर्वांना माहित


कारसेवक नसते तर अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं नसतं. राममंदिर जेंव्हा निर्माण झालं नव्हतं तेव्हा आम्ही दोनदा गेलो होतो. मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. यापुढेही अयोध्याला जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा तेव्हा जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मी कडवट हिंदुत्ववादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सर्वांना माहित आहे. आम्ही 22 तारखेला काळाराम मंदीरात जाऊन दर्शन घेणार आहे. यावेळी आम्ही काळाराम मंदीरातील कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींना देखील आमंत्रण देणार आहे. 22 तारखेच्या राममंदाच्या सोहळ्याचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावं.  


राष्ट्रपतींना आमंत्रण - 


अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा ही केवळ राममूर्तीची नाही, तर राष्ट्राची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा आहे. ह्यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येत आमंत्रित करावं. आम्ही काळाराम मंदिरात जी आरती करणार आहोत, त्यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावं, अशी आम्ही पत्राद्वारे मागणी करीत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.  


आम्ही सुद्धा नाशिकला काळाराम मंदिर येथे दर्शन करणार आहोत, कार्यक्रम करतो आहोत, त्याला सुद्धा राष्ट्रपती यांना आम्ही रीतसर निमंत्रण देत आहोत. आमचे खासदार रीतसर निमंत्रण देतील. राष्ट्रपती यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करावी, अशी आमची मागणी आहे याआधी सुद्धा तसा झालं आहे, असे ठाकरे म्हणाले.




तर आजचं राम मंदिर झालं नसतं -


मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही! कारसेवकांनी धाडस केलं नसतं, तर आजचं राम मंदिर झालं नसतं. राम मंदिर हा कारसेवकांचा गौरव आहे! झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ होती, तेव्हा तुम्ही कुठे होतात? शिवसेनेची घोषणा होती; पहले मंदिर, फिर सरकार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


अयोध्येला नक्की जाणार


मी अयोध्येला नक्की जाणार! राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही, ज्या ज्यावेळी माझ्या मनात येईल त्या त्यावेळी मी राम मंदिरात जाणार आहे. गद्दारांची घराणेशाही चालते का? म्हणजे, गद्दार तुम्हाला लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही प्राणप्रिय आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 


वाजपेयींचा फोटो कुठेय?


अटल सेतू उद्घाटन केलं पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो कुठे होता? आता राम मंदिरांचे उद्घाटन होते पण राम मंदिर असणार की नाही माहित नाही, असा टोला ठाकरेंनी लागवला.