मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत समावेश झाला आहे. पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपशासित राज्यातील एकही मुख्यमंत्री नाही. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियतेवर आयएएनएस आणि सी व्होटर्सने संयुक्तरित्या सर्व्हे केला आहे. या यादीत मुख्यमंत्री ठाकरे पाचव्या स्थानावर आहेत.

Continues below advertisement


आयएएनएस आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता 76.52 टक्के आहे. तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक अव्वल स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता 82.96 टक्के एवढी आहे.


आयएएनएस आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेतील टॉप 5 मुख्यमंत्री




  1. नवीन पटनायक (ओडिसा) - 82.96 टक्के

  2. भुपेस बघेल (छत्तीसगड) - 81.06 टक्के

  3. पी. विजयन (केरळ) - 80.28 टक्के

  4. जगनमोहन रेड्डी (आंध्र प्रदेश) - (78.52) टक्के

  5. उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) - 76.52 टक्के


CM Uddhav Thackeray | देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश, आयएएनएस आणि सी व्होटरचा संयुक्त सर्व्हे