मुंबई : महाविकास आघाडीने (Maha Vika Aghadi) 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या निषेधार्थ आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात बंदची घोषणा करण्यात आली आहे. उद्याचा बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केले आहे. या बंदमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच उद्या लोकल आणि बससेवा बंद ठेवण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत झालेल्या बंदप्रमाणेच उद्या बंद झाला पाहिजे. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सण उत्सव आहे म्हणून दुपारी 2 पर्यंत बंद करावा. सरकारला काही ही बोलू दे, जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे. लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवा. राज्यातील सुजाण नागरिकांना सांगतो उद्या 2 पर्यंत कडकडीत बंद पाळावा.
पोलिसांनी दादागिरी करू नका : उद्धव ठाकरे
लोकल आणि बस सेवा ही बंद ठेवायला हवी, पोलिसांनी दादागिरी करू नका. तसेच सरकारने, सत्ताधारींनी आततायीपण करु नये. पोलिसांनी दादागिरी करू नये. उद्याचा फज्जा उडवायचा प्रयत्न करू नका नाहीतर जनता दोन महिन्याने फज्जा उडवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
बहिणीची मतं नाही नातं महत्त्वाचं: उद्धव ठाकरे
पोलीस महासंचालिका महाराष्ट्राची लाडकी बहीण होऊ शकतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना दिला आहे. मुख्यमंत्र्यांसाठी बहिणींची केवळ मतं महत्त्वाची माझ्यासाठी नातं महत्वाचं असल्याचाही ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे : उद्धव ठाकरे
बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे. आजही अटक सुरू आहे दरोडेखोरांना आणतात तसे आणले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात काय सुरू काय बंद राहणार?
वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु राहतील औषधे, रुग्णालये सुरू राहणार आहे.
मुंबईतील स्कूल बस सेवा बंद
उद्या स्कूल बस मालक संघटना मुंबईतील स्कूल बसेस सेवा बंद ठेवणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून स्कूल बस मालक संघटनांनी निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची असून जर सरकार प्रत्येक बस मध्ये पोलीस सुरक्षा देत असे तर स्कूल बस चालवल्या जातील, या सगळ्या संदर्भातील माहिती स्कूल बस मालक संघटनांनी शाळांना दिली आहे सरकार स्कूल बसेस ला पोलीस संरक्षण देणार का याची प्रतीक्षा स्कूल बस मालक संघटना करत आहे
Uddhav Thackeray PC Video : कडकडीत बंदची घोषणा, बदलापूर घटनेचा निषेध; उद्धव ठाकरेंचं नागरिकांन आवाहन
हे ही वाचा :
उद्याचा महाराष्ट्र बंद संस्कृती विरुद्ध विकृती, दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा; उद्धव ठाकरेंचे आवाहन