Uddhav Thackeray on Ajit Pawar :  अजित पवार हे कायम उप असतात. त्यांना अखंड उप भव हा आशीर्वाद दिला आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपदावरुन अजित पवारांना खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे हे चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. आस्मानी संकटाशी लढलात आता सुलतानी संकटाशी लढायच आहे, ते अधिक कठीण वाटत असल्याचे ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे हा टोमणा आहे का?

मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे घराबाहेर पडले, आहो तुम्ही घराकडे लक्ष द्या असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरे टोमणे मारतात म्हणतात, पण शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे हा टोमणा आहे का? शेतकरी मदत मिळाली पाहिजे हा टोमणा आहे? कर्जमाफी करायचं तर समिती नेमता, संकट स्वदेशी आणि समिती नेमतायत  ' परदेशी ' अशी टीका देखील ठाकरेंनी केली. अजित पवार कायम उप असतात त्यांना आशीर्वाद दिला अखंड उप भव असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी  अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरून खोचक टोला लगावला. 

कृषीवीज बिल माफ घोषणा काय झालं? विम्याचे पैसे नाहीत, दगाबाज सरकार 

कृषीवीज बिल माफ घोषणा काय झालं? विम्याचे पैसे नाहीत, कर्जमाफी नाही, हे दगाबाज सरकार असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जूनमध्ये कर्जमुक्ती करणार, लावला कोपराला गुळ, करण तोपर्यंत निवडणुका होतील असेही ठाकरे म्हणाले. विम्याचे पैसे शेतकऱ्यांना द्या, नाहीतर शेतकरी तुमच्या कार्यालयात घुसतील असा इशारा ठाकरेंनी दिला. हे सडलेले आकलेलचे कांदे आहेत. कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही असेही ठाकरे म्हणाले. 50 हजार मिळत नाही तोपर्यंत, महायुतीला मत नाही. विहिरीतील गाळ निघत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. अमित शहा म्हणतात मुंबईत भाजपचा महापौर, आरे जा रे... मुंबई अजून दूर आहे असेही ठाकरे म्हणाले. मत चोरी करून हे सरकार आले आहे.  मला विश्वास आहे जे मला कुटुंबातील एक मानतात ते दगा फटका करू शकत नाहीत. साद घालील तेंव्हा रस्त्यावर यावं लागेल. हिम्मत असेल तर गावात बोर्ड लागले पाहिजेत असेही ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजला खेकड्याने भोकं पाडली का? जशी धरणाला पाडली होती, उद्धव ठाकरेंचा तानाजी सावंतांवर प्रहार