Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहेत. जालना येथे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे. दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
जालना येथील घटनेवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता. आज संध्याकाळी मी जालना जाणार आहे. नुसता निषेध करून चालणार नाही. विशेष म्हणजे यापूर्वीच सरकारवर ताशेरे न्यायालयाने मारले आहेत. आमची इंडियाची बैठक सुरु असताना एकाने पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे, पण राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे याची यांना माहिती नाही. मुख्यंमत्री आणि गृहमंत्री यांना राज्यात काय सुरु आहे, कोठे आंदोलन सुरु आहेत याची रोज माहिती मिळत असते. पण दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता. आता चौकशी करून तुम्ही काय करणार, नुसत्या चौकश्या लावल्या जाताय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर!
जालना येथील घटनेनंतर उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालना येथील दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई येथून उद्धव ठाकरे औरंगाबाद विमानतळावर पोहचतील, तेथून कारने ते जालना येथे जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्ते यांची भेट घेणार आहे. यावेळी ते गावकऱ्यांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे.
असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...
- सायंकाळी 5.00 वाजता मुंबईहून औरंगाबादकडे प्रयाण
- 5.45वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार
- 05.55 वाजता औरंगाबाद येथून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाकडे रवाना
- 7.00 आंतरवाली सराटी येथे आगमन आणि गावकरी यांची भेट.
- 7.25 अंबडकडे रवाना
- 7.50 अंबड शासकीय रुग्णालयात आंदोलक भेट
- 8.15 औरंगाबाद विमानतळावर प्रयाण
- 9.00 औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण
इतर महत्वाच्या बातम्या:
Jalna Protest : मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप