Aaditya Thackeray on Ekanth Shinde : शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोक्याच्या असलेल्या रेसकोर्सच्या जागेवरून हल्लाबोल सुरूच आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आता तिथं थीम पार्क नाही, तर सेंट्रल पार्क होत असल्याचे सांगितले आहे. आदित्य ठाकरे रेसकोर्स प्रकरणात सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. या संदर्भात आज (4 फेब्रुवारी) आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याव कडाडून हल्लाबोल केला. 


यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी रेसकोर्समधील भूमिगत कार पार्किंगला कडाडून विरोध केला. त्याचबरोबर घोड्यांच्या तबेल्यासाठी मुंबईच्या पैशांची लूट होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा दिला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा चांगला समाचार घेतला. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सीएस बनायचं आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असल्याचे आदित्य म्हणाले. 


स्वतः च्या माथ्यावर गद्दार लिहिलं आहे ते डिप क्लीन करावे


आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वत:च्या माथ्यावरील गद्दारीचा डाग डीप क्लीन करावा, असा बोचरा वार केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये डीप क्लिन मोहीम अंतर्गत पाण्याच्या दाबाने रस्ते स्वच्छ केले जात आहेत. हाच धागा जोडत  ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात गँगवॉर सुरु आहे त्याचे लीडर मुख्यमंत्री आहेत, असाही घणाघात आदित्य यांनी केला. भाजपनेही रेसकोर्सवरून भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. 


निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम 


आदित्य यांनी बीएमसीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पावरून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरु आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकार्पणाचे कार्यक्रम होत आहेत, अशी टीका त्यांनी केली.  कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत असल्याने आदित्य यांनी तोफ डागली. 


डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते


ठाकरे म्हणाले की, कोस्टल रोड प्रकल्प उद्धव साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या. बोगद्याची सुद्धा पाहणी केली. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते. एमटीएचएलचे तीन महिने उद्घाटन झाले नव्हते. 


इतर महत्वाच्या बातम्या